विविध व्यवसायातून महिलांनी सक्षम व्हावे : ॲड. श्रीरंग लाळे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 12, 2026

विविध व्यवसायातून महिलांनी सक्षम व्हावे : ॲड. श्रीरंग लाळे

 विविध व्यवसायातून महिलांनी सक्षम व्हावे : ॲड. श्रीरंग लाळे


मोहोळ (कटूसत्य वृत्त): आर्थिक विकास साधण्यासाठी महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध लघु व मध्यम व्यवसायामध्ये सक्रिय होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ॲड. श्रीरंग लाळे यांनी केले.

महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर आणि तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्पांतर्गत नवज्योत लोकसंचालित साधना केंद्र, मोहोळ येथे तालुक्यातील महिला लीडर यांच्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. लाळे बोलत होते.

या शिबिरात तालुक्यातील विविध महिला बचत गटांच्या प्रमुख महिला लीडर यांना कायदेविषयक तसेच व्यावसायिक बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी लघु व मध्यम उद्योग, स्वयंरोजगार आणि बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर तसेच तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्पांतर्गत नवज्योत लोकसंचालित साधना केंद्र मोहोळच्या अध्यक्षा मनीषा ननवरे, सचिव स्मिता कोकणे, क्षेत्र समन्वयक शुभांगी खांडके, ज्योती इंगळे, रेश्मा चौधरी, व्यवस्थापक राजेश जाधव, लेखापाल शेख यांच्यासह तालुक्यातील महिला लीडर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages