येणारे वर्षभर अकलूज येथे भरगच्च कार्यक्रम तर यंदाची त्रिमूर्ती केसरी
कुस्ती स्पर्धाही विशेष स्वरूपात होणार "सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते
पाटील यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती"
अकलूज (कटूसत्य वृत्त):-श्रीमती रत्नप्रभादेवी मोहीते पाटील यांची जन्मशताब्दी,जेष्ठ नेते जयसिंह मोहीते पाटील व मदनसिंह मोहीते पाटील या बंधुंची अमृत महोत्सवी वर्षाची वाटचाल याचे औचित्य साधून दि . १ डिसेंबर २०२३ ते १ डिसेंबर २०२४ या कालावधीत अकलूज येथे भरगच्च कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .अकलूज येथे सालाबाद प्रमाणे होणाऱ्या ञिमुर्ती केसरी कुस्ती स्पर्धाही वेगळ्या स्वरूपात होणार असल्याची माहिती स्पर्धेचे प्रमुख संयोजक सयाजीराजे मोहीते -पाटील यांनी दिली.
शंकरराव मोहीते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीङा मंङळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम साजरे करण्यात येणार आहेत .याविषयी प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष स्वरूपारानी मोहिते पाटील व युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली .यावेळी सुमित्रा पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव अंधारे आदी उपस्थित होते .यंदाच्या त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा दि. २९, ३० नोव्हेंबर ते १ ङिसेंबर रोजी शिवतीर्थ आखाङा शंकरनगर -अकलूज येथे आयोजीत करण्यात आल्या आहेत.
अर्जुन पुरस्कार प्राप्त, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु व माजी आयपीएस अधिकारी पैलवान कर्तारसिंग हे स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. हरियाणाचा मल्ल प्रविण भोला व कोल्हापुर येथिल महाराष्ट्र केसरी मल्ल पृथ्विराज पाटील यांच्यात तर पुणे येथील मल्ल समिर शेख व कंदर येथिल मल्ल सतपाल सोनवणे यांच्यात विशेष कुस्ती होणार आहे. ञिमुर्ती केसरीसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षिस दोन लाख, द्वितीय क्रमांकासाठी दिङ लाख, तृतिय एक लाख व चतुर्थ क्रमांकासाठी पन्नास हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांनी गत ५० वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात मोठे योगदान दिले आहे .अकलूजच्या वैभवात भर टाकणारे विविध उपक्रम व भव्य दिव्य कार्यक्रमाचे त्यांनी आयोजन केले आहे .त्यांच्या अनेक उपक्रमांची नोंद गिनीज व लिमका बुक मध्ये झालेली आहे . कला क्षेत्रालाही त्यांचे मोठे योगदान लाभले आहे . सलग २५ वर्षे चालणारी राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा त्यांनीच सुरू केली होती . ते यंदा आपल्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत . त्याचबरोबर त्यांना सक्षमपणाने साथ देणारे त्यांचे बंधू मदनसिंह मोहिते पाटील यांचीही अमृत महोत्सवी वाटचाल सुरू होत आहे . यानिमित्त आगामी वर्षात अकलूज येथे भरगच्च व विशेष कार्यक्रम होणार असल्याचे स्वरूपारानी मोहिते पाटील व सयाजीराजे मोहिते पाटील यांनी सांगितले .
0 Comments