Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर -मंगळवेढा महामार्ग रोखला

 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर -मंगळवेढा महामार्ग रोखला 


सोलापूर,(कटूसत्य वृत्त):-मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाज देगाव ग्रामस्थांच्यावतीने उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव येथे आज बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय मार्ग रोखून धरण्यात आला होता.

यावेळी सकाळी साडेनऊच्या सुमारास सर्व समाज बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हा परिषद शाळेजवळ येथे एकत्र आले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराज की जय, अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो, महात्मा बसवेश्वर महाराज की जय,एकच मिशन मराठा आरक्षण, लढेंगे जितेंगे हम सब जरांगे, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आधी विविध घोषणा देत रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी आंदोलन कर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, छगन भुजबळ, नारायण राणे, रामदास कदम, गुणरत्न सदावर्ते आदींवर सडकून टीका करण्यात आली. यावेळी दीपक कदम, हरिभाऊ गायकवाड, शिवाजी कदम, पंकज जगताप (उमरगा), बंडू गुंड आदींनी आपले विचार व्यक्त केले.

वाहनांच्या लांबच लांब रांगा 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी सोलापूर मंगळवेढा हा महामार्ग रोखून धरल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी नोकरदार, विद्यार्थी, तसेच कामानिमित्त बाहेर पडलेल्यांना आंदोलनाचा फटका बसला. तसेच आंदोलनामुळे पोलिसांनीही मोठा बंदोबस्त ठेवला होता.


ॲम्बुलन्सला दिला रस्ता

या रास्ता रोको आंदोलनादरम्यान मंगळवेढ्याहून सोलापूरला येणाऱ्या एका ॲम्बुलन्सला आंदोलनकर्त्यांनी रस्ता मोकळा करून दिला.


अन्य समाजाने दिला पाठिंबा 

वीरशैव लिंगायत समाज देगाव, अखिल भारतीय महादेव कोळी संघटना देगाव, महाराष्ट्र राज्य  चर्मकार संघटना शाखा देगाव या विविध समाजाच्या नेत्यांनी  मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनात जाहीर पाठिंबा दिला.

 

 विद्यार्थी हित पाहून आंदोलन लवकर संपवले 

 सध्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेस उशीर होऊ नये म्हणून सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी आपले रास्ता रोको आंदोलन वेळेपूर्वीच समाप्त केले.


आंदोलनकर्ते 

या आंदोलनात दीपक कदम, हरिभाऊ गायकवाड, सोमा गायकवाड, शिवाजी कदम, विजय जाधव, बाळासाहेब थोरात, योगेश जाधव, उमेश ताकमोगे, शिवराज  सुर्वे पाटील, स्वराज सुर्वे पाटील, अभिजीत सुपाते, प्रल्हाद शिंदे, तानाजी गुंड, बंडू भोसले, उमेश जाधव, शरद भोईटे, अण्णा दांडगे, संतोष जाधव, खंडू जाधव, गणेश भोईटे, डॉक्टर सचिन भोईटे, सागर आडके, बाबुराव हनमशेट्टी, उमेश हनमशेट्टी, दत्तात्रय वाघमारे, दत्ता कोठे, भीमराव जाधव, मोहन गायकवाड, गोरख राजगुरू, इकबाल चौधरी, बाळू कोळी,भीमराव कदम, राजू थोरात, विश्वनाथ बेनुरे, सचिन काळे, कान्हा गायकवाड, नवनाथ पवार, दिगंबर जगताप, सोमा जाधव, गणेश सुर्वे, शिवाजी सुर्वे, शिवरत्न चव्हाण, नागेश भोसले, प्रशांत गवळी, उमाकांत वाघ, बंडू सुपाते, बंटी सुर्वे पाटील, सुरेश ताकमोगे, महेश तावसे, मधु भोसले, बाळू गायकवाड, विजय कदम, बंडू जाधव, ज्ञानू कदम, संजय जाधव, तानाजी जगताप, तुकाराम भुसारे, रमेश धनवे, सुभाष जगताप, जालिंदर जगताप, रोहन डोंगरे, अरुण जगताप, संतोष सुपाते, भगवान जोशी, श्रीकांत भोईटे, कुमार कदम, सुरेश राऊत, चंद्रकांत राऊत, शिवा देवकते, रुद्रेश थोरात, सचिन अंबुरे, संजय शेळके, माऊली अवताडे, चंद्रकांत कराळे, विश्वनाथ कराळे, कल्याणी म्हमाणे, महादेव पाटील, बाबासाहेब मल्लाडे, गौरीशंकर पाटील, बाबासाहेब कापसे, यश वाघमारे, दत्ता रगडे यांच्यासह सकल मराठा समाज देगाव ग्रामस्थ, वीरशैव लिंगायत समाज, कोळी समाज बांधव, चर्मकार समाज बांधव, धनगर समाज बांधव, यांच्यासह परिसरातील वाड्यावर रस्त्यावरील, तसेच परिसरातील व्यापारी देखील सहभागी झाले होते.




Reactions

Post a Comment

0 Comments