नकोच कुठले मानसन्मान नि
नकोत तुमचे ते पुरस्कार
शाबासकीची थाप हवी
फक्त एकदा पाठीवर
नुसतीच नाही त्यांनी
पानावर पाने लिहली
अरे , साहित्याच्या सेवेसाठी
उभी हयात घालवली
कुठून आली ही पिळावळ
प्रसिध्दी करता हपापली
विकत घेतले पुरस्कार नि
अध्यक्षाची जागा पटकावली
प्रतिभेच्या कसोटीवर जेंव्हा
साहित्य तपासले जाईल
फुटेल भ्रमाचा भोपळा
निराशा पदरी येईल
सरस्वतीचा लिलाव करत
दलाल फिरतो आहे
प्रसिध्दीचे आमिष दाखवून
पोट भरतो आहे
हेमंत रत्नपारखी
रा. मंगळवेढा जि. सोलापूर
मो.नं. ९८२२२३३३९५

No comments:
Post a Comment