माणसाला सन्मान देणारे महान संविधान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 8, 2023

माणसाला सन्मान देणारे महान संविधान

माणसाला सन्मान देणारे महान संविधान 


(सोलापूर कटूसत्य वृत्त):- संविधानापुर्वी देशात मनुस्मृती नुसार कायदे होते म्हणून हजारो वर्षांपासून माणसाला माणसापासून दुर केले, माणसाने माणसाला हिन व तुच्छ लेखुन स्वतः ला इतरांना पेक्षा श्रेष्ठ लेखण्याची व माणुसकी ला काळीमा फासणारी संस्कृती येथे होते. कुत्र्या मांजराला घरा वावर होता पण माणसाला गाव बंदी होती, गावात राहणाऱ्यांना मनुस्मृती विरूद्ध बोलण्याचे वागण्याचे स्वातंत्र्य नव्हते. केवळ सेवा करून एकाच वर्णाचे श्रेष्ठत्व मान्य करायचे व स्वतः कमवलेले दान दक्षीणा स्वरूपात देऊन मोकळे व्हायचे. देशात ब्रिटिश आले ब्रिटिशांच्या येण्याने शिक्षण, राजकारण व नोकरी मध्ये हजारो वर्षांपासून हक्क अधिकार नाकारून माणसिक गुलाम बनवलेल्या लोकांना स्थान मिळाले परंतु सामाजिक पातळीवर मात्र मनुचेच कायदे अस्तित्वात होते. परंतु बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या सर्वांगीण उन्नतीसाठी जगातील एकमेव श्रेष्ठ संविधान निर्माण केले व सर्वात अगोदर मनुस्मृती ने प्रस्थापित केलेली विषमता, अस्पृश्यता व भेदभाव बाजूला सारून प्रत्येक माणासाला सारखे केले. मनुस्मृती ने चार वर्ण तयार करून त्यांची कामे वाटून दिली व एका वर्णातुन दूसऱ्या वर्णात जाण्याचे सर्व रस्ते बंध करून दिलेल्या कामाला च धर्म मानून धर्माचे पालन करणे हेच पुण्याचे काम समजून माणसाला मर्यादित, गुलाम करून एकप्रकारे माणसाचे अस्तित्व च नाकारले. परंतु हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या व्यवस्थेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून उलथून टाकून प्रत्येक माणसाला समान केले. भारतीय संविधान कलम १४ नुसार समतेचा अधिकार बहाल केला आणि धर्म, वंश, लिंग, जात किंवा जन्मस्थान यावरून कोणताही भेद करता येणार अशी तरतुद केली. म्हणजे आता वर्णव्यवस्था नसुन प्रत्येक जन माणूस म्हणून जगेल व सारख्या च प्रमाने सर्वांना महत्त्व राहील. कोणीही श्रेष्ठ कनिष्ठ राहणार नाही. म्हणजेच कायदा प्रत्येकाचे समान संरक्षण करेल. हजारो वर्षांपासून स्वतः चे वर्चस्व स्वतः सांगणाऱ्यांना, व इतरांना तुच्छ लेखणाऱ्यांना या कलमामुळे धक्काच बसला. कारण मनुस्मृती नुसार चार वर्ण समप्रमाणात कधीच येऊ शकत नव्हते. प्रत्येकाला काही मर्यादा होत्या परंतु संविधानाने सर्व तोडून, वर्णव्यवस्था गाडून मानसाला महत्त्व निर्माण करून दिले. पुढे कलम क्रमांक १५ मध्ये राज्य कोणत्याही नागरिकांशी धर्म,जात,वंश,लिंग व जन्मस्थान यावरून भेदभाव करणार नाही. थोडक्यात काय तर जात धर्म लिंग वंश बघून कोणत्याही सरकारला कोणतीही बाब नाकारून लोकांना वंचित ठेवता येणार नाही. कलम क्रमांक १७ नुसार कोणत्याही नोकरी मध्ये वरील बाबीचा विचार करून नोकरी नाकारता येणार नाही. कारण संविधानापुर्वी ब्रिटिश राजवट वगळता मोक्याच्या ठिकाणी एकाच वर्णाचे वर्चस्व होते. हे वर्चस्व कलम क्रमांक १६ ने नष्ट करून माणसाला प्राधान्य दिले. कलम क्रमांक १७ नुसार अस्पृश्यता निवारण करून समतेची क्रांती केली. कलम क्रमांक १४,१५,१६ मध्ये माणसाला समता प्रस्थापित करून दिलीच. परंतु वर्णव्यवस्थेमधुन पुढे निर्माण झालेली अस्पृश्यता नष्ट करणेही गरजेचे होते. कारण मनुस्मृती नुसार माणसाच्या स्पर्शाने काही लोक बाटायचे. आता कलम १७ नुसार बाटणारे लोक पवित्र करण्याचे काम केले. आणि कलम क्रमांक१७ असताना एखादा व्यक्ती स्पर्शाने बाटलाच तर बाटणाऱ्याला शिक्षा होते. म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन कलम १७ ने केले आहे. आता काही लोकांना प्रश्न पडला असेल कलम १४-१६ तिन कलमांनुसार धर्म, जात, वंश लिंग व जन्मस्थान वरून भेद करताच येत नव्हता तळ मग कलम क्रमांक १७ हे घेण्यामागचे मुळ कारण काय तर. थोडक्यात सांगायचे झाल्यास भारत जातीप्रधान आहे. म्हणुन प्रत्येक जात एकमेकांना उच्च निच समजत असते. जाती जातीतील लोकांनी भेद करू नये जसे बामणांनी मराठा, जाट, राजपूत यांना कमी लेखु नये मराठ्यांनी कुणबी, तेली,माळी साळी, कुंभार धनगर यांना कमी लेखु नये व अशा प्रकारची विषमता राहुच नये म्हणून १४-१६ कलम आणि ज्यांना अस्पृश्य समजून गावाबाहेर ठेवले मांग, महार चांभार, भंगी अशा जाती साठी कलम क्रमांक १७ हि गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कलम क्रमांक १८ नुसार लष्करी व शैक्षणिक पदव्या वगळून इतर सर्व पदव्या बंद केल्या जसे अनेकांना पुर्वी वेगवेगळ्या पदव्या देऊन त्या पदव्याच्या आधारे त्या व्यक्तीला वेगळे स्थान दिले जायचे. परंतु कलम १८  नुसार सर्व पदव्यावर बंधी घालून सर्व माणसे समान आहेत. केवळ सैन्यात मिळालेल्या पदव्या व शैक्षणिक क्षेत्रात मिळालेल्या पदव्याच वापरण्याचा अधिकार मिळाला. म्हणजे हजारो वर्षांपासून माणसा माणसात फुट पाडून त्यांना जवळ येऊ दिले जात नव्हते. एकमेकांना माणूस म्हणून न बघता केवळ त्यांचा वापर करून त्यांचे माणसिक व शारीरिक शोषण केले जायचे अशा लोकांना भारतीय संविधानाने माणुन तर बनवले परंतु माणसाचे अस्तित्व कायम रहावे म्हणुन संरक्षण केले. मनुस्मृती नुसार वेद स्मृती हेच सर्वश्रेष्ठ आहे. स्मृती ने निर्माण केलेले वर्ण व वर्णानुसार वाटून दिलेले काम प्रत्येकाने करायला पाहिजे. मनुस्मृती व त्यामध्ये लिहलेले याविरोधात कोणीही काहीच बोलु नये. जो मनुस्मृती व ब्राम्हणाच्या विरोधात बोलेल तो शुद्र समजला जाईल असे निर्बंध लादले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम क्रमांक १९ नुसार देशातील प्रत्येक नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊन बोलण्याचा, व्यक्त होण्याचा, मत मांडण्याचा अधिकार दिला. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक बोलायला लागला, वेगवेगळ्या माध्यमातून आपले मत मांडायला लागला. आणि हीच गोष्ट विषमतावादी व्यवस्था चालवणाऱ्याच्या जिव्हारी लागली. कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सुरवातीलाच विषमता वादी व्यवस्था उखडून समतावादी व्यवस्था प्रस्थापित करून त्याचे संरक्षण केल्याने मनुस्मृती नुसार चालणाऱ्यांचा धर्म धोक्यात आला. कारण हजारो वर्षांपासून जे नाकारले होते स्वातंत्र्य कलम क्रमांक १९-२२ ने देशातील प्रत्येक माणसाला बहाल केले. पुढे संविधानाचे कलम २३ते २४ मध्ये शोषणा विरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार मिळाला. जाती प्रधान देशात अनेकांचे हक्क अधिकार नाकारले गेले म्हणून मुलभूत गरजा ही पुर्ण करणे अनेकांकडून शक्य होत नव्हते म्हणून तर इतिहासात आपण बघितले तर पडेल ती कामे माणसाकडून करून घेतली जात. व मोबदल्यात एक वेळचे जेवण, शिळी भाकरी, किंवा खाऊन उरलेले अन्न दिले जायचे. अर्थात स्वरूप बदलून हे प्रत्येक जातीधर्मात होते. अशा प्रथा रुढी बंद करण्याचे काम कलम २३, २४ ने केले. वेठबिगारीच्या नावाखाली मोजकाच मोबदला देऊन त्यांच्या कडून अनेक काम करून पशुप्रमाने वागणूक दिली जात होती. प्रत्येक माणसाला जिव असतो, मान सन्मान असतो हे विसरून जाउन पशुप्रमाने महिला व पुरुषांचे शोषण केले जायचे याला संविधाने आळा घातला. पुढे कलम क्रमांक २५-२८ धार्मिक स्वातंत्र्य बहाल करून प्रत्येक व्यक्तीला आपल्याला धर्माचे पालन करणे, उपासना करणे, धार्मिक कार्यक्रमाला हजर राहणे, धार्मिक कार्यासाठी निधी देण्याचे हक्क संविधानाचे बहाल केले. त्या अगोदर फक्त दान दक्षिणा ब्राम्हणांना देण्याचा अधिकार होता. संविधानाने दान दक्षिणा, धार्मिक कार्यासाठी निधि देण्याचा अधिकार दिला परंतु तो द्यायलाच पाहिजे यावर बंधन घातले नाही. थोडक्यात आपल्या मर्जीने लोक धर्माचे पालन करून धर्माचा प्रचार प्रसार वैयक्तिक पातळीवर करू शकतात. वरिल बाबी़चा विचार केला तर संविधानाने माणसाला माणसातच आणले नाही तर त्यांचे अस्तित्व निर्माण करून त्यांना संरक्षण देऊन मान सन्मान तर दिलाच परंतु सर्वांना समान केले आणि येथेच मनुस्मृती चे कायदेशीर अस्तित्व संपुष्टात आले. परंतु वैयक्तीक पातळीवर मनुस्मृती ला माणणारे लोक आजही जे लोक अंधविश्वास, पाखंड व धर्माच्या नावाखाली एकत्र येतात त्यांना संविधान कळूच नये म्हणून इतर कामात व्यस्त करून संविधानाबद्दल दिशाभूल करणारी माहिती देतात. आणि स्वतःला गुणवंत व आभ्यासु, ज्ञानी समजणाऱ्यांना अजून संविधानाचे महत्त्व व गांभीर्य कळत नसेल तर त्याला गुणवंत वा शिक्षीत कसे म्हणावे. हजारो वर्षांपासून गुलामीत खितपत पडलेल्या लोकांना माणसात आणणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर एका जातीचे उद्धाते आणि संविधान एका जातीची संपती असे वाटत असेल तर अशा विचारांच्या लोकांना कोणत्या शब्दात बोलुन त्यांचा सन्मान करावा? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणसात आणुन माणसिक गुलामीतुन मुक्त केले तरीही लोकांना संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कळत नसतील तर त्यांच्या बुद्धीची किव येते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages