विजापूर रोडवर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 3, 2026

विजापूर रोडवर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

 विजापूर रोडवर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विजापूर रोडवरील हत्तूर परिसरात पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रहमान मौला ढवळगी (वय 48) आणि राजू इमामसाब शेख (वय 35) हे पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास हत्तूर येथून सलगर वस्तीच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रक (क्र. MH 13 EP 2340) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला उपचारासाठी शासकीय छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages