कुर्डूवाडी..ढवळस ते भोगेवाडी रस्त्यासाठी 14 कोटी 50 लाख मंजूर संजय मामा शिंदे
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील ढवळस येथे आज सकाळी कुर्डूवाडी..ढवळस ते भोगेवाडी रस्त्याचे उद्घाटन करमाळा तालुकाचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले
कुर्डूवाडी ढवळस ते भोगेवाडी रस्त्याची लांबी कुर्डूवाडी करमाळा रोड पासून 0/000 ते 17/200 की मी लांबी असून त्यासाठी 14 कोटी 50 लक्ष रुपये मंजूर झाले असल्याची माहिती संजय मामा शिंदे यांनी उद्घाटन वेळी दिली.
कार्यक्रमा चे प्रास्ताविक ढवळस माजी सरपंच संदिपान भाऊ गव्हाणे यांनी केले तर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व ढवळस उपसरपंच संतोष दादा अनभुले, लक्ष्मण शेळके यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमा चे आभार ढवळस माजी सरपंच अमर इंगळे साहेब यांनी मानले. या वेळी ढवळस, चौभेपिंपरी, महादेवाडी, जाखले , भोगेवाडी, भोसरे ,रोपळे क , कुर्डूवाडी, बादलेवाडी येथील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला क्रिडा क्षेत्रातील सर्व मान्यवर हितचिंतक, ढवळस ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments