सुगंधी दिवाळी आनंदी दिवाळी या संकल्पनेतून जनआधार फाऊंडेशनकडुन सुगंधी उठणे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 13, 2023

सुगंधी दिवाळी आनंदी दिवाळी या संकल्पनेतून जनआधार फाऊंडेशनकडुन सुगंधी उठणे वाटप

 सुगंधी दिवाळी आनंदी दिवाळी या संकल्पनेतून जनआधार फाऊंडेशनकडुन सुगंधी उठणे वाटप



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  दिपावलीचा आनंद द्विगुणित व्हावा,या उद्देशाने जनआधार फाऊंडेशन कडुन संस्थापक आनंद गोसकी यांच्या संकल्पनेतुन 'सुगंधी दिवाळी आनंदी दिवाळी' या उपक्रमाच्या माध्यमातुन   सोलापूर महापालिका प्रभाग क्र 8 मध्ये  दरवर्षी प्रमाणे जनआधार फाऊंडेशनच्या वतीने आनंद गोसकी यांच्या पुढाकाराने परीसरातील दीड हजार कुटुंबियांना 9 नोंव्हेंबर /10 नोंव्हेंबर घरोघरी जावुन  नागरीकांना सुगंधी उठणे वाटप करण्यात येते. 
सुगंधी उठणे हा अगदी अगरू उद,चंदन,कस्तुरी,केशर,ईत्यादी सुगंधी पदार्थापासुन केलेल मिश्रण असते. हा अंगास लावुन शरीर/चेहरा स्वच्छ होउन कांती उजळते.
नागरीकांना उठणे वापरण्याची माहिती देवुन शुभेच्छा संदेश देण्यात आले.
नागरीकांनी आनंद गोसकी यांना ही आर्शिवादरूपी दिपावलीच्या शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी जनआधार फाऊंडेशनकडुन महेश दासी,शाम कोटा,रूषिकेश चिलवेरी,दिनेश सुरा,दिनेश श्रीकोंडा,शंकर म्हंता,हर्षित गोसकी यांनी घरोघरी जावुन नागरीकांना कोणतेही समस्या असल्यास नागरीकांनी संपर्क साधण्यास आव्हान आनंद गोसकी मिञ परीवाराकडुन करण्यात आले. तसेच दिवाळी निम्मित्त जनआधार फाऊंडेशनच्यावतीने गरजूंना फराळ वाटप करण्यात येते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages