रोटरी क्लब ऑफ करकंब चा राष्ट्रशिल्प पुरस्कार केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांना प्रदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 17, 2023

रोटरी क्लब ऑफ करकंब चा राष्ट्रशिल्प पुरस्कार केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांना प्रदान

 रोटरी क्लब ऑफ करकंब चा राष्ट्रशिल्प पुरस्कार केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांना प्रदान


माढा (कटूसत्य वृत्त):- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांमध्ये उतुंग कार्य करणाऱ्या व्यक्तींना रोटरी कडून  सन्मानपूर्वक सन्मानित केले जाते  केंद्रप्रमुख दिगंबर काळे  यांनी शैक्षणिक क्षेत्रात कोविड च्या काळात झाडाखाली शाळा गृहभेटीत अध्यापन तंबाखू मुक्त शाळा वृक्षारोपण वृक्षसंवर्धन माझी समृद्ध शाळा लोकसहभागातून भौतिक सुविधा बेटी बचाव बेटी पढाव निपुण भारत केंद्रस्तरीय स्नेहसंमेलन ज्ञानरचनावाद आझादी का सुवर्णमोहोत्सव  व इतर उपक्रम प्रभावीपणे राबविले त्यामुळे त्यांना रोटरी क्लब ऑफ करकंब कडून राष्ट्रशिल्प पुरस्कार देऊन त्यांच्या गुणगौरव करण्यात आला हा पुरस्कार रोट्रीयन स्वाती हेरकळ अध्यक्ष रघुनाथ जाधव सचिव डॉ अक्षय मोरे  डॉ प्रशांत मोरे डॉ निशिगंधा कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला चांगल्या कार्याची दखल घेत रोटरीने जो पुरस्कार दिला तो खूपच प्रेरणादायी असून आणखी चांगले काम करण्यासाठी बळ मिळाले असे केंद्रप्रमुख दिगंबर काळे म्हणाले

यावेळी रोटरी मध्ये कार्यरत सर्व सदस्य सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे आतर बाबी शिक्षक सुहास चवरे श्रीकांत काशीद विठोबा गाडेकर अर्जुन गवळी दिनेश गुंड सूर्यकांत उबाळे धनाजी घाडगे व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages