दहीटणे ता.बार्शी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन.. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 17, 2023

दहीटणे ता.बार्शी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन..

 दहीटणे ता.बार्शी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन..

वैराग ( कटूसत्य वृत्त ):- बार्शी तालुक्यातील दहीटणे येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते १ कोटी ३९ लाख रुपये मंजूर विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले तसेच दहीटणे गावासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांचा कृतज्ञता सोहळ्यातून नागरी सत्कार करण्यात आला.

दहीटणे येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी,गावअंतर्गत पाईप लाईन व विहीर करणे यासाठी १ कोटी १३ लाख,२५/१५ योजने मधुन सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे यासाठी १० लाख,जिल्हा नियोजन सेस फंडातून जाधव वस्ती रस्ता करणे यासाठी १० लाख, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ६ लाख आदी कामांचे उद्घाटन करण्यात आले.

आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले की,ग्रामीण भागाच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून बार्शी तालुक्यातील प्रत्येक गावातील मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी व गावातील रस्ते अनेक विकास कामे पूर्ण करण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहील.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष(दादा)निंबाळकर,बार्शी नगरपालिकेचे माजी नगरसेवक विलास(आप्पा)रेणके,पंचायत समितीचे माजी सभापती भाऊसाहेब काशीद,उपसरपंच संभाजी घोंगाणे,सचिन जगझाप नानासाहेब धायगुडे,विनायक देशमुख, सुरज सौदागर,नेताजी घायतिडक,संजय आवारे,परमेश्वर पाटील, अमोल देशमुख,राहुल खरात,दिनेश राक्षे,मोहन आवारे मेजर, शिवाजी आवारे,राजाभाऊ आवारे,संदीप क्षीरसागर,ओंकार गायकवाड,माऊली आवारे,जयसिंग राक्षे ,आदेश घोंगाणे, रोहित काशीद, सूरज सौंदळे, पांडुरंग ताटे ,प्रशांत काशीद,चंपक काशीद , भाऊसाहेब जगदाळे, नामदेव काशीद ,कृष्नाथ आप्पा काशीद, नेमिनाथ साखरे, दत्तात्रय राऊत, यशवंत राऊत, दिलीप सौंदळे ,बाप्पा साठे, प्रवीण चेट्टी ,शाहजी काशीद, प्रताप नाना पाटील, विनोद जगझाप, लक्ष्मीसगर काशीद ,काका साठे ,नंदकुमार सौंदळे ,बिरमल कोळी ,काकासाहेब आंधळकर, अशोक साखरे, दगडू आबा काशीद, दत्तात्रय जाधव ,तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages