*शालेय बॉक्सिंग स्पर्धा;*
*नेताजी प्रशालेस २६ पदकांची कमाई**
सोलापूर (कटूसत्य वृत्त):--सोलापूर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा कार्यालय,क्रीडा परिषद व बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका येथे घेण्यात आलेल्या शालेय बॉक्सिंग स्पर्धेत निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने ६ गोल्ड,११ सिल्व्हर व ९ ब्राँझ पदकांची कमाई केली. विभागीय स्पर्धेसाठी सहा खेळाडूंची निवड झाली आहे.
*निकाल*
*१४ वर्षे मुले* -ओंकार कोठा ( ४०-४२ किलो) सिल्व्हर पदक,सत्यसाई मायकुंटे ( ४६-४८ किलो ) सिल्व्हर,अनिकेत जाधव ( ४८-५० किलो ) ब्राँझ, *१७ वर्षे मुले* -अखिलेश गुडा ( ५२-५४ किलो ) ब्राँझ, *१९ वर्षे मुले* - रोहित वाघमोडे (४६-४९ किलो ) सिल्व्हर,आदित्य मोहरकर (४६-४९ किलो) गोल्ड,यश आयगोळे (४९-५२ किलो) ब्राँझ, साईराम क्यादारी( ४९-५२ किलो ) सिल्व्हर, दर्शन मुंजाळे (५२-५६ किलो) ब्राँझ,ऋषिकेश सिरसिल्ला (५२-५६ किलो) सिल्व्हर,सक्षम जाधव( ६०-६४ किलो) सिल्व्हर,अभिषेक राठोड (६०-६४ किलो )गोल्ड,शिवराज करणकोटी (६४-६६ किलो) गोल्ड, *१७ वर्षे मुली* -स्वाती देवकर (४४-४६ किलो) ब्रांझ,शितल महामुनी( ४६-४८ किलो) सिल्व्हर,रेखा भोसले (४८-५० किलो) ब्राँझ, समृद्धी कोक्कूल( ६०-६३ किलो) गोल्ड ,महेक हिरेमठ (६०-६३ किलो) सिल्व्हर,सौम्या बिराजदार (७०-७५ किलो) ब्राँझ, साक्षी बेदरकर(७०-७५ किलो) सिल्व्हर, *१९ वर्षे मुली* -अश्विनी पेगड्याल (४२-४५ किलो )ब्रांझ,निकिता बाके( ४५-४८ किलो) ब्राँझ,अंकिता गौडगाव (४५-४८ किलो )सिल्व्हर,पूजा शिरगण (५१-५४ किलो )सिल्व्हर,अमूल्या मासापत्री (६४-६६किलो) गोल्ड,मुस्कान मुल्ला (७५-८१ किलो) गोल्ड या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा प्रमुख विठ्ठल कुंभार, सूर्यकांत बिराजदार ,अशोक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार, प्राचार्य रविशंकर कुंभार, सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदींनी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेच्या यशस्वी खेळाडू समवेत संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार, प्राचार्य रविशंकर कुंभार, सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, क्रीडा प्रमुख विठ्ठल कुंभार, सूर्यकांत बिराजदार अशोक पाटील

No comments:
Post a Comment