उंदरगांव ते उपळाई (खुर्द) गावचा रस्त्याच्या प्रश्नी उंदरगाव ग्रामस्थांचे
उपोषण,आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांच्या मध्यस्थीने उपोषण
मागे
माढा (कटूसत्य वृत्त):- उंदरगाव ते उपळाई(खुर्द)या गावांना जोडणारा रस्ता मंजुर करण्याच्या मागणीसाठी उंदरगाव मधील नागरिकांनी गुरुवारी उपोषण केले. भाजपाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उंदरगाव च्या ग्रामस्थांच्या आंदोलनाची दखल घेतली. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भारत पाटील यांच्या माध्यमातून उपोषण कत्याॅ नागरिकांशी संवाद साधला.लवकरच या रस्त्याला मंजुरी मिळवुन निधी उपलब्ध करुन देण्याचे ठोस आश्वासन आमदार मोहिते पाटील यांनी दिल्यानंतर उपोषण कत्याॅ ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
मागील जवळपास ३० ते ४० वर्षांपासून उंदरगाव ते उपळाई(खुर्द) हा रस्ता दुर्लक्षित असुन या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे.रस्ताच नसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांची देखील मोठी गैरसोय होत आहे.अनेकदा लेखी तोंडी मागणी करुन देखील लोकप्रतिनिधींकडून रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने उंदरगाव मधील नागरींकानी संताप व्यक्त करुन उपोषण अस्र हाती घेतले होते.गुरुवारी सकाळी आंदोलनाला सुरूवात केली.उंदरगांव ते उपळाई रस्ता दुरुस्ती करुन डांबरीकरण करण्याची आग्रही मागणी उपोषण कर्त्या नागरिकांनी यावेळी केली.उपोषणात ग्रामपंचायत सदस्य दिपक आरे,बालाजी नाईकवाडे,अजिंक्य चव्हाण,अरविंद नाईकवाडे, कुर्डुवाडी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री.हांडे,कनिष्ठ अभियंता श्रीमती जावळकोटे, हरिभाऊ माने,प्रहार संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे,उपसरपंच समाधान मस्के, नितीन मस्के,संतोष माने,सत्यवान लटके,भाऊ पाटेकर,वैभव नाईकवाडे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:
Post a Comment