सोलापुरात जनगणना 2027 प्रशिक्षण शिबिर; डिजिटल पद्धतीने होणार जनगणना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, April 25, 2026

सोलापुरात जनगणना 2027 प्रशिक्षण शिबिर; डिजिटल पद्धतीने होणार जनगणना

 सोलापुरात जनगणना 2027 प्रशिक्षण शिबिर; डिजिटल पद्धतीने होणार जनगणना




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर प्रगणक (कर्मचारी) व पर्यवेक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन हुतात्मा स्मृती मंदिर येथे करण्यात आले. या शिबिरात जनगणना प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन करून कामकाज कसे पार पाडायचे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी माहिती देताना सांगण्यात आले की, ही भारताची 16 वी जनगणना असून देशाच्या 155 वर्षांच्या जनगणनेच्या परंपरेचा भाग आहे. मागील जनगणना 2018 दरम्यान पूर्ण झाली होती. पुढील जनगणना 2021 मध्ये अपेक्षित होती; मात्र कोविड-19 महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता 2026-27 या कालावधीत जनगणना पार पडणार आहे.

यंदाची जनगणना पारंपरिक पद्धतीऐवजी पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असून ‘एचएलओ’ (HLO) अॅपद्वारे माहिती संकलित केली जाणार आहे. 1 मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांना स्वयं-नोंदणी करता येणार असून, 16 मे ते 15 जून दरम्यान प्रगणकांकडून घराघरात जाऊन माहिती संकलन केले जाणार आहे.

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जनगणनेचे राष्ट्रीय विकासातील महत्त्व अधोरेखित केले. अचूक व विश्वसनीय माहिती संकलन हे नियोजनाचे भक्कम अधिष्ठान असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करत नागरिकांशी सौजन्याने वागावे आणि कोणतीही माहिती अपूर्ण किंवा चुकीची राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

या शिबिरात जनगणनेची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, माहिती संकलनाची पद्धत तसेच संभाव्य अडचणी व त्यावरील उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करून अचूक माहिती द्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी आशिष लोकरे, सहायक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, जिल्हा जनगणना समन्वयक अजित बांड (मुंबई), तसेच इतर अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages