शिंदेवाडीच्या प्राजक्ता शिंदेची भारतीय नौदल दलात निवड,प्रशिक्षण पुर्ण
करुन गावात येताच ग्रामस्थांनी काढली बैलगाडीतून मिरवणुक
माढा (कटूसत्य वृत्त):- शिंदेवाडी (ता.माढा) येथील प्राजक्ता बाळासाहेब शिंदे हिची भारतीय नौदल दलात निवड झाली.प्राजक्ता प्रशिक्षण पूर्ण करुन गावात येताच ग्रामस्थांनी वाजत गाजत बैलगाडीतून मिरवणुक काढली.
हलाखीच्या परिस्थितीतून मार्गक्रमण करुन प्राजक्ताने जिद्द चिकाटी,आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले.प्राजक्ताचे वडिल सेट्रिंग चे काम करतात तर आई शेतातील कामे करुन उदरनिर्वाह भागवतात. प्राजक्ताने पहिल्याच प्रयत्नात भारतीय नौदलात स्थान पटकावुन शिंदेवाडी सारख्या ग्रामीण भागातील मुलीसमोर आदर्श निर्माण केला आहे.आई वडिलांच्या कष्टाचे भान मनात ठेऊन अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळेच मी हे यश संपादन केल्याचे प्राजक्ताने ग्रामस्थांना बोलताना सांगून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षे बाबत मार्गदर्शन केले.नौदलाची प्रशिक्षण पूर्ण करुन गावात येताच कुटुंबासह गावकऱ्यांनी बैलगाडी मधुन वाजगाजत मिरवणूक काढुन तिचे कौतुक केले.महिलांनी प्राजक्ताचे औक्षण केले.यावेळी संदीप शिंदे,शंभु साठे,संजय सावंत,रोहन शिंदे,नानासाहेब शिंदे, रामभाऊ शिंदे,बापु शिंदे,निळु शिंदे,औदुंबर उबाळे,संतोष शिंदे,बंडु शिंदे,गणेश शिंदे,दयानंद शिंदे,अनिल शिंदे,नवनाथ शिंदे, सुरज शिंदे,सचिन शिंदे,बनु शिंदे,औदुंबर शिंदे,करण ढेरे, मदन शिंदे,विवेक भराटे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:
Post a Comment