रोटरी तर्फे युवकांसाठी उद्योग मंथन शिबीर संपन्न! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 14, 2023

रोटरी तर्फे युवकांसाठी उद्योग मंथन शिबीर संपन्न!

 रोटरी तर्फे युवकांसाठी उद्योग मंथन शिबीर संपन्न!


कळंब(कटूसत्यवृत्त):-आजच्या युवकांमध्ये नेतृत्वगुण वाढीस लागावेत तसेच त्यांच्या व्यक्तीमत्वाच्यां विचारधारेचा विकास व्हावा म्हणून ही तरुण पिढी निर्माण व्हावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीच्या वतीने उद्योग मंथन या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचा लाभ कळंब व आसपासच्या परिसरातील युवकांनी, उद्योजकांनी व समाजातील इतर वेगवेगळ्या घटकांनी घेतला. या शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला.

युवकांना उद्योगाविषयीचे ज्ञान मिळावे तसेच उद्योग कसा निवडावा, निवडल्यानंतर तो कसा चालवावा म्हणजे मार्केटींग कसे करावे, उद्योगासाठी उपलब्ध असलेल्या सबसिडीचे मार्गदर्शन करण्यासाठी चावडी या नामांकित संस्थेचे संस्थापक  अमित मखरे  तज्ञ म्हणून लाभले. या शिबीराचा २०० पेक्षा अधिक युवकांनी निशुल्क लाभ घेतला. उद्योग मंथन शिबीरास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. सुनिल पवार  तसेच संस्थेचे सचिव  डॉ. अशोक मोहेकर उपस्थित होते.

उद्योग मंथन शिबीराचे आयोजन रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे अध्यक्ष  रवि नारकर , सचिव  डॉ. साजेद चाऊस यांनी केले होते . 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages