संघटनेमध्येच यश असते- प्रणव परिचारक...
कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंतीनिमित्त सुपंत गौरव
पुरस्काराचे वितरण
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंतीनिमित्त येळे वस्ती येथील राजयोगिनी अहिल्यादेवी होळकर मागासवर्गीय ट्रस्टच्या संस्थापिका माजी नगरसेविका कमलताई तोंडे यांच्यावतीने सुपंत गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचेे अध्यक्ष प्रणव परिचारक म्हणाले की, राजकारण करीत असताना सर्वांनाच संधी मिळत असते. मात्र यामध्ये सर्वसमावेशक नेतृत्व हे आदरणीय सुधाकरपंत परिचारक यांच्यासारख्या संस्कारशील नेत्यांमध्ये घडते. याकरिताच संघटन हे सर्वात महत्वाचे आहे. संघटनेच्या पायावरच यश मिळत असते असे प्रतिपादन प्रणव परिचारक यांनी केले.
या कार्यक्रमात सुपंत गौरव पुरस्कार 2023 चे मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्कार प्राप्त माती पाणी परीक्षण तज्ञ श्री.बाळासाहेब लवटे, करकंब पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. निलेश तारू साहेब, लाईफ लाईन हॉस्पिटल पंढरपूर येथील मेंदू तज्ञ डॉ.प्रविण वायकुळे, मा. रेल्वे पोलीस अधिकारी संजय चिटणीस, सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भारूड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला डि.व्ही.कुलकर्णी सर, रा.पां.कटेकर, सी.एन.देशपांडे साहेब, बाजार समितीचे उपसभापती राजूबापू गावडे, तम्मा घोडके, विवेक परदेशी, प्रितम येळे साहेब, आदित्य फत्तेपूरकर, सचिन कुलकर्णी, मंगळवेढ्याचे नेते युन्नूसभाई शेख, राजाभाऊ आंधळगावकर, पंडीत शेंबडे, आदित्य जोशी, अरिहंत पब्लिक स्कूलच्या प्राचार्य सौ.सुप्रियाताई बहिरट, शोभाताई बडवे, सौ.रेणुकाताई देशपांडे, डॉ.भाग्यश्री वायकुळे, सौ.रेणुकाताई घोडके, सौ.सुनिता तोंडे, सौ.शैलजा सलगर, सौ.विद्या बर्गे आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त सुधाकरपंत परिचारक यांना अभिवादन करण्यासाठी परिसरातील बहुसंख्य प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
सुत्रसंचलन ओंकार देसाई तर आभार युवराज सलगर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश देसाई, अजिंक्य इंदापूरकर, वैभव यादव, रविभाऊ येळे, मिलिंद येळे, ज्ञानेश्वर तारे, दिपक येळे, प्रमोद राजहंस, सुनिल चव्हाण, अशोक घोडके, संतोष वरपे, अर्जुन वाळूजकर आदिंनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment