जगदंब नवरात्र तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न आयोजन
चळे (कटूसत्य वृत्त):- तालुका पंढरपूर येथील जगदंब नवरात्र तरुण मंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सव निमित्त शनिवार दि.२१ रोजी रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरामध्ये ६४रक्तदात्यानी रक्तदान केले.तर आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ३५ नागरिकांची तपासणी करण्यात आली.या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या शुभहस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून असून पोलिस निरीक्षक अरुण फुगे,पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत,प्रकाश भुजबळ,राहुल गुटाळ, डॉ.खाडिलकर,उपस्थित होते. रक्त संकलन करण्यासाठी पंढरपूर ब्लड बँक यांनी सहकार्य केले.तर नागरिकांची आरोग्य तपासणी आरोग्य अधिकारी डॉ. शितल फराटे,आरोग्य सेविका रेखा गेडाम,आरोग्य सेवक रियाज शेख,आशा सेविका माया वाघमोडे,सुरेखा पवार,सारिका वाघमारे यांच्या उपस्थितीत झाली.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जगदंबा नवरात्र तरुण मंडळाचे मार्गदर्शक श्रीनिवास बनसोडे,राजेंद्र गायकवाड यांच्या सह मंडळाचे अध्यक्ष अक्षय गायकवाड,हनुमंत बनसोडे, रणजीत बनसोडे,विशाल हांडे,राजू निर्मळ,योगेश मोरे,सागर गायकवाड, राजेंद्र फुगारे यांनी परिश्रम घेतले.

0 Comments