Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग‎ २२ मध्ये भाजप उमेदवारांच्या‎ पदयात्रेला मतदारांचा‎ उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग‎ २२ मध्ये भाजप उमेदवारांच्या‎ पदयात्रेला मतदारांचा‎ उत्स्फूर्त प्रतिसाद




सोलापूर :(कटूसत्य वृत्त):-   ‎ सोलापूर‎ महानगरपालिका‎ निवडणुकीच्या‎ पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२‎ मधील भारतीय‎ जनता पार्टीचे‎ अधिकृत‎ उमेदवार किसन जाधव,‎ दत्तात्रय नडगिरी,‎ सौ. अंबिका‎ नागेश गायकवाड‎ आणि‎ सौ.‎ चैत्राली शिवराज गायकवाड‎ यांच्या प्रचाराला नागरिकांकडून‎ प्रतिसाद मिळत असल्याचे‎ चित्र दिसून‎ येत‎ आहे.‎ मंगळवारी‎ सेटलमेंट‎ परिसरात पदयात्रा‎ व‎ मतदार संवाद कार्यक्रमाचे आयोजन‎ करण्यात‎ आले‎ होते.
ईच्छा भगवंताची परिवाराचे‎ आधारस्तंभ‎ व मार्गदर्शक लक्ष्मण जाधव‎ तसेच‎ प्रभाग‎ क्रमांक‎ २२ चे‎ माजी नगरसेवक नागेश‎ गायकवाड‎ यांच्या‎ मार्गदर्शनाखाली ही‎ पदयात्रा‎ पार‎ पडली.‎ यावेळी लिमयेवाडी, कावळा गल्ली, मंजुनाथ नगर, सनत नगर‎ आदी भागांमध्ये‎ नागरिकांच्या‎ गाठीभेटी‎ घेत‎ त्यांच्या‎ समस्या,‎ सूचना व अपेक्षा‎ जाणून‎ घेण्यात आल्या.
प्रचारादरम्यान‎ पालकमंत्री जयकुमार गोरे,‎ आमदार विजयकुमार देशमुख,‎ आमदार सुभाष देशमुख आणि‎ आमदार देवेंद्र‎ कोठे‎ यांच्या माध्यमातून प्रभागात‎ राबविण्यात‎ आलेल्या‎ विकासकामांची माहिती‎ मतदारांशी‎ संवादातून देण्यात आली.‎ रस्ते,‎ पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज, आरोग्य,‎ स्वच्छता आणि‎ पर्यावरण‎ विषयक‎ कामांना पुढील‎ काळात प्राधान्य‎ दिले जाईल, असे‎ उमेदवारांनी सांगितले.‎ पदयात्रेदरम्यान‎ नागरिकांनी स्थानिक‎ प्रश्न मांडत भविष्यातील विकासाबाबत‎ अपेक्षा‎ व्यक्त केल्या.‎
Reactions

Post a Comment

0 Comments