भाजप गटनेतेपदी सतीश काळे पाच वर्षांसाठी सर्वानुमते निवड
मोहोळ (कटूसत्य वृत्त) : मोहोळ नगरपरिषदेतील भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी सतीश काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत भाजपच्या नवनिर्वाचित ११ नगरसेवकांच्या उपस्थितीत पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली.
निवडीनंतर नूतन गटनेते सतीश काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील, शहाजहान शेख, प्रतापसिंह गरड, बाळासाहेब गायकवाड, निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर यांच्यासह शहर व तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गटनेत्यांच्या निवडीनंतर आता उपनगराध्यक्ष पदाची निवड व स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वीकृत नगरसेवक पदाची लॉटरी कुणाला लागणार, तसेच नूतन गटनेत्यांप्रमाणे उपनगराध्यक्ष पदाची निवडही पाच वर्षांसाठी केली जाणार की अनेक इच्छुक असल्याने एकाहून अधिक उपनगराध्यक्षांची निवड करण्याचे धोरण राबविले जाणार, याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झा
0 Comments