बॅलेट मतपत्रिकेचे रंग वेगवेगळे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 7, 2026

बॅलेट मतपत्रिकेचे रंग वेगवेगळे

 बॅलेट मतपत्रिकेचे रंग वेगवेगळे





सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून यंदाची मतदान प्रक्रिया थोडी वेगळी राहणार आहे. यंदा बॅलेट युनिटवर उमेदवारांचे नाव आणि चिन्हांच्या पुढे वेगवेगळे रंग असलेल्या मतपत्रिका असणार आहेत.
       प्रभाग एक ते 24 साठी चार वेगवेगळे मतपत्रिका तर 25 आणि 26 साठी तीन वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असणार आहेत. प्रभाग एक ते 24 साठी चार मतदान तर 25 आणि 26 साठी मतदारांना तीन मतदान करावे लागणार आहे. पूर्ण मतदानाची प्रक्रिया झाल्याशिवाय बीपिंगचा आवाज येणार नाही, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली.

यंदा प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे ठेवण्यात आले आहेत. ‌'अ‌' जागेसाठी पांढरा, ‌'ब‌' जागेसाठी फिका गुलाबी, ‌'क‌' जागेसाठी फिका पिवळा तर ‌'ड‌' जागेसाठी, फिका निळा रंग असणार आहे. त्यामुळे मतदारांनी मतदान करताना रंगांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 24 मधील मतदारांना चार मते द्यावी लागणार आहेत. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या जागेसाठी बटन दाबल्यानंतर उमेदवाराच्या नावासमोरील लाल दिवा लागेल, मात्र बीप आवाज येणार नाही. चौथ्या व शेवटच्या जागेसाठी मतदान केल्यानंतर दीर्घ बीप आवाज येईल. याच बीप आवाजानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजावे.

प्रभाग क्रमांक 25 व 26 साठी तीन मते द्यायची असून पहिल्या दोन जागांसाठी बीप आवाज येणार नाही, तर तिसऱ्या व अंतिम मतानंतर दीर्घ बीप ऐकू येईल. तसेच कोणताही उमेदवार पसंत नसल्यास प्रत्येक जागेसाठी ‌'नोटा‌' हा पर्याय उपलब्ध आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत राहणार आहे. यंदा ‌'एक मत‌' नव्हे तर प्रभागानुसार तीन किंवा चार मते द्यायची असल्याने प्रत्येक मतदाराने जागरूक राहून योग्य पद्धतीने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

* मतपत्रिकांचे रंग असे :

अ जागा : पांढरा

ब जागा : फिका गुलाबी

क जागा : फिका पिवळा

ड जागा : फिका निळा

* प्रभाग क्रमांक 1 ते 24 :

एकूण 4 मते द्यायची

पहिली, दुसरी, तिसरी जागा : लाल

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages