Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ नगराध्यक्ष वस्त्रेंचा जातीचा दाखला रद्द करण्याची मागणी

 मोहोळ नगराध्यक्ष वस्त्रेंचा जातीचा दाखला रद्द करण्याची मागणी




क्षीरसागर यांची जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार

मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षा सिद्धी राजू वस्त्रे यांनी कोणताही राज्यघटने पूर्वीचा ठोस कागदोपत्री पुरावा नसताना फक्त चुलत्याच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे हिंदू बेडा जंगम या अनुसूचित जातीचा दाखला मिळवला असल्याचा आरोप करत तो तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी सोमेश क्षीरसागर यांनी सोलापूर येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दाखल केलेल्या तक्रारीत केली आहे.

मोहोळ नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शीतल सुशीलकुमार क्षीरसागर यांच्या विरोधात सिद्धी वस्त्रे या विजयी झाल्या होत्या. सदर नगराध्यक्षपदाची जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव होती. या पार्श्वभूमीवर निवडणुकीतील पराभूत उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी सोमेश क्षीरसागर यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, सिद्धी वस्त्रे या मूळ हिंदू जंगम समाजातील असून त्यांनी हिंदू बेडा जंगम जातीचा दाखला मिळवण्यासाठी स्वतःचा शालेय दाखला (सन २००३) व वडील राजू विश्वनाथ वस्त्रे यांचा शालेय दाखला (सन १९६९) जोडलेला आहे त्यावरती हिंदू बेडा जंगम असा उल्लेख आहे परंतु ते १९५० च्या नंतरचे पुरावे आहेत. मात्र, राजू वस्त्रे यांचा जोडलेला जातीचा दाखला विना क्रमांकाचा १९७८ असून त्यासाठी आवश्यक कोणतेही १९५० पुर्वीचे पुरावे सादर करण्यात आल्या नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच, सिद्धी वस्त्रे यांचे आजोबा विश्वनाथ वस्त्रे यांच्या जन्म 1928 चा आहे व त्यांचा शाळेतला प्रवेश 1933 चा आहे व त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्या वरती हिंदू जंगम असा उल्लेख आहे व सदरची जात इतर मागासवर्गीय या संवर्गात येते आणि जातीच्या दाखल्यामध्ये हिंदू बेडा जंगम असा स्पष्ट उल्लेख आहे. हे दोन्ही परस्पर विरोधी आहे असे असताना, राजू विश्वनाथ वस्त्रे यांच्या शालेय नोंदीत बेडा जंगम असा उल्लेख आहे जात ही वडिलांपासून येत असते त्यामुळे सदरची नोंद बेकायदेशीर व नियमबाह्य असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

सिद्धी वस्त्रे यांच्या वडिलांचा किंवा आजोबांचा हिंदू बेडा जंगम या जातीचा दाखला पडताळणी समितीने आजतागायत वैध केला नाही. त्यांचे चुलते दीपक विश्वनाथ वस्त्रे यांचा २०१३  जातीचा दाखला जात पडताळणी समितीने वैध केलेला आहे हे नक्की खरे आहे पण त्यावेळी त्या प्रकरणांमध्ये कोणती कागदपत्रे जोडली आहेत याबाबत त्यांनी त्यांच्या प्रकरणात खुलासा केलेला नाही. फक्त तो जात वैधत प्रमाणपत्र पडताळणी जोडून त्या आधारे त्यांनी त्यांची जात प्रमाणपत्र पडताळणी ची मागणी केली आहे ती कायदेशीर दृष्ट्या योग्य नाही. त्यांनी राज्यघटनेच्या पूर्वीचा म्हणजेच १९५० पूर्वीचा जन्म-मृत्यू नोंदी शाळा सोडलेला दाखला किंवा महसुली पुरावे ज्यामध्ये ठोस बेडा जंगम अशी नोंद असलेला पुरावा सादर करावा अन्यथा सदरचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत असा ठाम दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments