आ. विजयकुमार देशमुख यांच्या प्रमाणेच विकासात योगदान- गणेश वानकर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी ज्या पद्धतीने या भागाचा विकास केला ,त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक ६ मध्ये विकास कामात आपले जास्तीतजास्त योगदान होते, आणि यापुढेसुद्धा राहणार असल्याचे सांगत, सोलापूर महानगरपालिकेत भाजपच सत्तेत येणार असल्यामुळे विकास कामांना भरभरून निधी मिळणार असल्याचे,भाजपचे उमेदवार आणि पॅनल प्रमुख गणेश वानकर यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक ६ चे भाजपचे उमेदवार गणेश वानकर,सोनाली गायकवाड ,मृणमयी गवळी आणि सुनील खटके यांनी बुधवारीसुद्धा होम टू होम प्रचाराचा धडाका कायमच ठेवला आहे.
आवसे वस्ती आमराई,समता नगर ,गंगा नगर,लक्ष्मी नगर,जुना देगाव रोड या भागात उमेदवारांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या भागातील विविध मंदिरांमध्येसुद्धा जाऊन उमेदवारांनी दर्शन घेतले. तसेच आरतीसुध्दा केली.तसेच वृद्ध मंडळींचे आशीर्वाद घेत त्यांच्या तब्बेतीचीसुद्धा विचारपूस केली.
यावेळी महिला,युवती,तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
यावेळी बोलताना पॅनल प्रमुख गणेश वानकर म्हणाले,आवसे वस्ती आमराई भागात आपण उत्तम दर्जाचे रस्ते तयार केले आहेत. ड्रेनेजची मोठी समस्या सोडविली आहे. क्रांती नगर व अन्य परिसरात दिवाबत्तीची सोय केली आहे. साठे पाटील वस्ती,थोबडे वस्ती,थोबडे मळा , बल्लारी चाळ या भागाचासुद्धा कायापालट केला आहे. देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे.आता सोलापूर महागरपालिकेतसुद्धा भाजपाची सत्ता येणार असल्याने विकासाला भरपूर निधी मिळणार आहे, असे ते म्हणाले.
भाजपच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सहा मधील दमाणी नगर,गवळी वस्ती, लक्ष्मी विष्णू मिल चाळ आदी भागात मोठी विकासकामे केल्याचे सुनील खटके यांनी सांगितले.
यावेळी संजय डोके,मेजर कांबळे,अलदार सर,ज्ञानेश्वर कदम,शिवणा जगताप ,सतीश आवटे ,सैफन सय्यद,सैफन शेख,प्रकाश अजलापूरकर ,अजय रूपनर यांच्यासह परिसरातील नागरिक आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=====================
दादा चारही मते कमळाला .....
====================
प्रभाग क्रमांक ६ मध्ये मागील तीन दिवसापासून भाजपच्या सर्व चारही उमेदवाराचा प्रचाराचा झंजावात सुरु आहे. या दरम्यान अनेक गोड अनुभव येत आहेत. बुधवारी आवसे वस्ती भागात प्रचारा दरम्यान उमेदवार गणेश वानकर एका वयोवृद्ध मातेशी बोलत असताना त्या मातेने दादांना आशीर्वाद देताना आपल्या उजव्या हाताची चार बोटे दाखवून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष आपले मत कमळाला असल्याचे सांगून टाकल्याची चर्चा रंगली होती.

0 Comments