Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग २० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा धडाकेबाज प्रचार

 प्रभाग २० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा धडाकेबाज प्रचार



तौफिक पैलवान यांच्या नेतृत्वाखाली घड्याळाला मत देण्याचे थेट आवाहन

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार आक्रमक प्रचाराला सुरुवात केली आहे. हद्दवाढ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नयी जिंदगी परिसरात पॅनल प्रमुख तौफिक इस्माईल शेख (पैलवान) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणी मजबूत करत निवडणूक वातावरण तापवले आहे.

छोट्या-छोट्या बैठका, गल्लोगल्ली संवाद आणि होम-टू-होम प्रचारातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार थेट जनतेसमोर जात आहेत. तोफिक पैलवान, अबूबकर हारून सय्यद, परविन रफिक इनामदार आणि कुरेशा नुरोद्दीन मुल्ला हे उमेदवार प्रत्येक घरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडत आहेत.

सिद्धेश्वर नगर परिसरात झालेल्या प्रतिष्ठित नागरिकांच्या बैठकीत उमेदवारांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. यावेळी बोलताना नुरोद्दीन मुल्ला म्हणाले, “लोकांच्या फसव्या आणि चिकनी-चुपडी बातींना भुलू नका. या वेळी घड्याळालाच मतदान करा,” असे ठाम आवाहन त्यांनी केले.

उमेदवारांनी पुढे सांगितले की, “अजितदादांचा शब्द म्हणजे विश्वासाची हमी आहे. अल्पसंख्याक समाजाच्या हक्कासाठी अजितदादा नेहमीच खंबीरपणे उभे राहिले आहेत. या वेळी प्रभाग २० चा चेहरामोहरा बदलायचाच आहे. आम्ही केवळ आश्वासन नाही, तर ठोस काम करून दाखवणार आहोत,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. “घड्याळाला मत द्या, विकासाला साथ द्या” या घोषणा देत कार्यकर्त्यांनी वातावरण अधिकच तापवले. नागरिकांमध्येही परिवर्तनाची भावना दिसून येत असून, प्रभाग २० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.

आक्रमक प्रचार, थेट संवाद आणि विश्वासार्ह नेतृत्वाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग २० मध्ये इतिहास घडवणार, असा आत्मविश्वास उमेदवार व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments