प्रभाग ४ मध्ये सुशील बंदपट्टे यांचा ‘होम टू होम’ प्रचार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 8, 2026

प्रभाग ४ मध्ये सुशील बंदपट्टे यांचा ‘होम टू होम’ प्रचार

 प्रभाग ४ मध्ये सुशील बंदपट्टे यांचा ‘होम टू होम’ प्रचार



नागरिकांशी थेट संवाद; मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर उपाययोजनांची ग्वाही

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार सीए सुशील बंदपट्टे यांनी ‘होम टू होम’ प्रचारावर भर दिला आहे. मंगळवारी त्यांनी प्रभागातील न्यू बुधवार पेठ परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेत थेट संवाद साधला.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून बंदपट्टे यांचा न्यू बुधवार पेठ, मराठा वस्ती, जम्मा चाळ, श्रीराम नगर आदी भागांमध्ये होम टू होम प्रचार सुरू असून, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात समस्या व सूचना मांडल्या जात आहेत. या भेटीदरम्यान पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज लाईनची समस्या, घंटागाडी वेळेवर न येणे, परिसरातील अस्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

काही भागांमध्ये तर विद्यमान नगरसेवक नागरिकांपर्यंत पोहोचलेच नसल्याची तक्रारही नागरिकांनी केल्याचे बंदपट्टे यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून या समस्या कायम असूनही त्यावर प्रभावी उपाययोजना झाल्या नसल्याची भावना नागरिकांमध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.

या सर्व प्रश्नांवर पॅनलच्या वतीने ठोस व प्रभावी उपाययोजना करून त्यांचे निराकरण करण्याची ग्वाही देण्यात आल्याचे बंदपट्टे यांनी सांगितले. ड्रेनेज लाईन दुरुस्ती, नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्थेचे बळकटीकरण, रस्त्यांची कामे, ज्येष्ठ नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

होम टू होम प्रचारामुळे नागरिकांशी थेट संवाद साधता येत असून, त्यांच्या अडचणी व अपेक्षा समजून घेण्यास मदत होत असल्याचे बंदपट्टे यांनी स्पष्ट केले. एकंदरीत प्रभाग ४ मध्ये त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, उपस्थित करण्यात आलेल्या प्राथमिक सुविधांच्या प्रश्नांवर पॅनलच्या वतीने निश्चित तोडगा काढण्याची ग्वाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages