विद्युत रोषणाईने उजळले सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त सोलापूरमधील मंदिर परिसर उजळून निघाला आहे. यात्रेची सुरुवात 10 जानेवारीपासून योगदंड पूजनाने होणार असून, मुख्य सोहळा 12 जानेवारीपासून सुरू होईल.
यात्रेचा सर्वात भव्य भाग म्हणजे 14 जानेवारीला होणारा अक्षता सोहळा, ज्यामध्ये लाखो भक्त सहभागी होणार आहेत. मंदिराच्या शिखरावर आणि भिंतींवर सोनेरी विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रात्री या रोषणाईचे प्रतिबिंब तलावात दिसून मंदिराला अद्भुत सौंदर्य मिळते.
देवस्थान पंचकमिटी कडून यात्रेची जय्यत तयारी सुरू असून, भक्तांसाठी विशेष सोयी, व्यवस्थापन आणि सुरक्षा यांची दक्षता घेतली जात आहे.
सोलापूरकरांना आणि शहराबाहेरील भाविकांना या धार्मिक यात्रेत सहभागी होण्यासाठी उत्सुकता आहे, ज्यामुळे सोलापूर शहर साजलेले आणि भक्तिमय वातावरणात झळाळून उभे राहणार आहे.

0 Comments