महिलांनी सक्षमपणे कार्यरत राहिले पाहिजे : डॉ. वाघमारे
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या नारीशक्ती पुरस्काराचे वितरण !
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महिला ही आता अबला राहिली नाही. तेव्हा महिलांनी निर्भीडपणे आपल्या क्षेत्रात वाटचाल केली पाहिजे. सक्षमपणे कार्यरत राहिले पाहिजे, असे आवाहन दिव्या डेंटल हॉस्पिटलच्या डॉ. वैशाली वाघमारे यांनी केले.
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने नारीशक्ती पुरस्कार वितरण सोहळा रंगभवन चौकाजवळील समाजकल्याण केंद्रात पार पडला. त्याप्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरकारी वकील अँड हेमा शिंदे, अमरआयु हॉस्पिटलचे डॉ.श्वेता शहा, सखीज योगा स्टूडीयोच्या अध्यक्षा स्मिता दुधनकर , सी.ए.असोसिएशनच्या माजी अध्यक्षा निलाशा नोगजा, श्रीमंतयोगी महिला सदस्य वंदना आंळगे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. वाघमारे पुढे म्हणाल्या, काळानुसार बदल होत आहेत. त्यानुसार महिलांनीही सकारात्मक बदल केला पाहिजे. कुणाची साथ असो अथवा नसो. कुणाचा आधार असो अथवा नसो महिलांनी स्वतंत्र व निर्भीडपणे आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहण्याची गरज आहे. नारीशक्ती नावाने पुरस्कार मिळाल्याने मोठे समाधान आणि प्रेरणा मिळाली.
सुत्रसंचालन नर्मदा कनकी व प्रथमेश कासर यांनी केले तर आभार अक्षता कासट यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष अंलकुटे, दिपक कारकी, महेश ढेंगले, प्रकाश आंळगे, शामकुमार मुळे, राजेश केकडे, दिपक बुलबुले, आकाश लखोटिया, दिनेश मंत्री, अभिजित व्हानकळस, श्रीपाद सुत्रावे, रविशंकर जवळे, माधुरी चव्हाण, अँड.ज्योती गायकवाड, शुभांगी लचके, अँड.मंजुश्री देशमुख, भारती जवळे, अनिता रेळेकर, शिला तापडीया आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
--- यांचा झाला नारीशक्ती पुरस्काराने गौरव !
यावेळी सोमपा डफरीन हॉस्पिटलच्या परिचारिका सुनिता ढगे ( वैद्यकीय सेवा ), उमाबाई श्राविका कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. प्रतिभा कंगळे (शिक्षण), अमृता नॅपकिन बुके प्रोप्राइटर अमृता कुलकर्णी (उद्योग), भारती अक्सा लाईफ इन्शुरन्स मॅनेजर श्वेता बेंद्रे (विमा), सोलापूर सामाजिक वनीकरण विभाग मुख्यलेखापाल संध्याराणी बंडगर (वनविभाग), वृत्त निवेदिका पल्लवी पवार (माध्यम ), आशा वर्कर विणा सुरवसे ( आरोग्य सेवा), निकीता जितरी (क्लासेस), मॉडेल रायफल शूटर प्रशिक्षिका अलिशा पुरी ( प्रशिक्षण) आदी नऊ मान्यवर महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

0 Comments