Hot Posts

6/recent/ticker-posts

नेहरू युवा केंद्राचे एमटीएस सुभाष चव्हाण निलंबीत

 नेहरू युवा केंद्राचे एमटीएस सुभाष चव्हाण निलंबीत


सोलापूर,(कटूसत्य वृत्त):-स्थानिक प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधी दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी दोन वाजता नेहरू युवक केंद्र कार्यालयात आले असताना कार्यालयामध्ये दारूच्या बॉटल सापडल्या याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर वृत्त प्रसारित झाले होते.

    इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या त्या वृत्ता बाबत नेहरू युवा केंद्राचे एमटीएस सुभाष चव्हाण हे दोषी आढळले आहेत. नेहरू युवा केंद्रात दारूच्या बॉटल सापडणे व अन्य काही आरोप सुभाष चव्हाण यांच्यावर लावण्यात आले आहेत. प्रसारित झालेल्या वृत्तानुसार सुभाष चव्हाण हे प्राथमिक स्तरावर दोषी आढळले आहेत. चव्हाण यांच्या अशा वर्तुणुकीमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नेहरू युवा केंद्र संघटनाची प्रतिमा मलीन झालेली आहे.

      उपरोक्त संपूर्ण स्थिती लक्षात घेता सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार नेहरू युवा केंद्र सोलापूरचे एमटीएस सुभाष चव्हाण यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत  चव्हाण यांचे निलंबन कालावधीत नेहरू युवा केंद्र सोलापूर हेच मुख्यालय राहणार असल्याचेही त्यात नमूद केलेले आहेअशी माहिती सोलापूर नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments