Hot Posts

6/recent/ticker-posts

दहिटने ता. बार्शी येथे शिवसुवर्ण चॅरीटेबल ट्रस्ट संचलित भिमाला फाउंडेशन तर्फे भव्य मोफत सर्व रोग निदान रक्तदान व अवयवदान संकल्प शिबिराचे आयोजन

 दहिटने ता. बार्शी येथे शिवसुवर्ण चॅरीटेबल ट्रस्ट संचलित भिमाला

 फाउंडेशन तर्फे भव्य मोफत सर्व रोग निदान रक्तदान व अवयवदान

 संकल्प शिबिराचे आयोजन 

वैराग (कटूसत्य वृत्त):-शिवसुवर्ण चॅरीटेबल ट्रस्ट संचलित भिमाला फाउंडेशन तर्फे भव्य मोफत सर्व रोग निदान रक्तदान व अवयवदान संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर च्या तज्ञ डॉक्टरांनी मोफत तपासणी व औषधोपचार केला.

  सदरील शिबिराचे उद्घाटन सभापती भाऊसाहेब काशीद , मेजर सुशील बादगुडे,  मेजर अस्लम नदाफ , योगेश मुलगे , सागर काशीद , संदीप पाटील यांच्या हस्ते भिमाशंकर नानांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलाने झाली.

गावच्या लोकांचे आरोग्य चांगले राहावे व गावात रक्तदान व अवयवदान बद्दल जनजागृती व्हावी यासाठी याचे आयोजन केले व इथून पुढेही प्रत्येक वर्षी आयोजीत करण्यात येईल असे मत डॉ.संकेत साखरे व आदेश साखरे यांनी व्यक्त केले.

सदर शिबिर यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी बाबासाहेब काशीद , स्वरूप चेट्टी, प्रसाद चेट्टी, मनोज साखरे , नितीन साखरे , हर्षद साखरे , अर्जुन पवार , नानासाहेब घोंगाने आदींनी परिश्रम घेतले तर काका आंधळकर यांनी सूत्रसंचालन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments