बार्शी तालुक्यात राजकीय नेत्यांना गावात प्रवेश नाही
मराठा आरक्षणाच्या मुद्दावर प्रवेश बंदीचे बोर्ड झळकू लागले
वैराग (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात ५८ मूक मोर्चे निघाले. गत म हिन्यात मनोज जरांगे- पाटील यांचे १७ दिवसांचे आमरण उपोषण झाले. तर १४ ऑक्टोबर रोजी न भूतो न भविष्यती अशी आंतरवली सराटी येथे महासभा झाली. मराठा आरक्षणाच्या मुद्दावर महाराष्ट्र शासनाची उदासीनता दिसून येत आहे. याच पाश्र्वभूमीवर शासनकर्त्यांना जाग आणण्यासाठी गावोगावचा मराठा समाज आरक्षणाच्या मुद्दावर पेटून उठला असून, आता राजकीय पक्ष तसेच राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदीचे बोर्ड सोशल मिडियासह गावच्या वेशीवर झळकत आहेत. बार्शी तालुक्यातील सुर्डी गुरपोळी (त.म) या ग्रामस्थांनी एकजुटीने हा निर्णय घेतला असून, पुढील काही दिवसात बार्शी तालुक्यातील अनेक गावांमध्ये असेच चित्र उभे राहिल. अशी शक्यता नाकारता येत नाही. असे सकल मराठा समाजातील जाणकारांनी भाष्य केले.

0 Comments