Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांची दिशाभूल करणार्‍या मविआविरुद्ध जोडे मारो व माफीनामा आंदोलन !

 महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांची दिशाभूल करणार्‍या मविआविरुद्ध जोडे मारो व माफीनामा आंदोलन ! 

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी  महाविकास आघाडी सरकारची पोलखोल करत, महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेला कंत्राटी कामगार भरतीचा निर्णय रद्द केला आहे. या कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. या विरोधात मोहोळ नगरपरिषद समोर मोहोळ तालुका ,शहर भाजपा व युवा मोर्चा द्वारे महाविकास आघाडी च्या नेते मंडळीच्या फोटो वर जोडे मारो व माफीनामा द्यावा म्हणून आंदोलन करण्यात आले. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आणि मविआने महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, याशिवाय भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही. 

   या ठिकाणी किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री शंकरराव वाघमारे,  तालुकाध्यक्ष श्री सुनील चव्हाण, शहराध्यक्ष श्री सुशील क्षीरसागर व युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री गणेश झाडे यांनी आंदोलनात मविआ विरुद्ध तीव्र शब्दात विचार मांडले.

 यावेळी लोकसेवक श्री.संजय क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष श्री.सतीश काळे, प्रदेश कार्यकारणी आमंत्रित सदस्य श्री.संजीव खिलारे, मोहोळ विधानसभा अध्यक्ष श्री.दिलीप गायकवाड, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष श्री. शशिकांत गावडे, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले,रमेश माने,  मुजीब मुजावर,  विष्णुपंत चव्हाण, फंटू गोफने , .अविनाश पांढरे, नागेश क्षीरसागर, अंकुश अवताडे,रणजित चवरे,  भारत आवारे, दीपक पुजारी, मुंढेवाडी सरपंच  अमोल व्यवहारे, श्री राहुल व्यवहारे, श्री दिलीप पाटील,श्री गुरुराज तगडे, श्री औदुंबर वाघमोडे, श्री विशाल पवार, विशाल चौधरी वकील,द्रोणाचार्य लेंगरे अक्षय वाघमोडे,  शैलेश कुंभार ,  पप्पू लांडगे आदीसह भाजपा तालुका,शहर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments