Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी आम्ही नवदुर्गा नव्या युगाच्या हा उदबोधक कार्यक्रम आणि भित्तीपत्रिका उद्घाटन संपन्न..

 श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी आम्ही नवदुर्गा नव्या

 युगाच्या हा उदबोधक कार्यक्रम आणि भित्तीपत्रिका उद्घाटन संपन्न..

माढा (कटूसत्य वृत्त):- श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी आम्ही नवदुर्गा नव्या युगाच्या हा एक अनोखा उदबोधक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून याच ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता अकरावीच्या कु.ईश्वरी तळेकर, कु.सायली बिचीतकर, कु.सानिया पठाण, कु.राजनंदिनी जगताप, कु.अर्चना शिंदे, कु.अमृता तळेकर, कु.श्वेता काळे, कु.विद्या कांबळे, कु.चंदना तळेकर या  विद्यार्थिनी होत्या.

     यावेळी प्रथम परमपूज्य डॉ बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशीला देवी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे आणि वक्त्या असणाऱ्या या कॉलेजच्या विद्यार्थीनीच्याच हस्ते आम्ही नवदुर्गा नव्या युगाच्या या भितीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुण्या व वक्त्या असणाऱ्या नऊ विद्यार्थीनीनी आपल्या मनोगतात संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे, पी. टी. उषा, किरण बेदी, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सावित्रीबाई फुले, लता मंगेशकर, आनंदीबाई जोशी, प्रतिभाताई पाटील या कर्तुत्ववान महिलांचा जीवनपट सांगून त्यांचे असामान्य असणारे मोठेपण आपल्या भाषणातून व्यक्त केले.

यावेळी इयत्ता बारावी मधील होतकरू व गुणवंत विद्यार्थिनी कु. अश्विनी तळेकर हिला गुणवंत विद्यार्थिनी म्हणून ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. फिजा सय्यद, प्रास्ताविक कु. प्रियंका चव्हाण तर आभार कु. तनाज मुलानी या विद्यार्थीनीने केले. 

     या अभिनव कार्यक्रमास प्राचार्य श्री सुभाष कदम, दयानंद तळेकर, प्रा.डॉ. मच्छिंद्र नागरे , प्रा.एस.के.पाटील,  प्रा. संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे, प्रा. सतीश बनसोडे ओंकार गायकवाड उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments