Hot Posts

6/recent/ticker-posts

सार्वजनिक नवरात्रोत्सव मध्यवर्ती महामंडळ नऊ दिवस नारी शक्तीचा सन्मान सार्वजनिक नवरात्रोत्सव मध्यवर्ती महामंडळाचा उपक्रम

 सार्वजनिक नवरात्रोत्सव मध्यवर्ती महामंडळ

        नऊ दिवस नारी शक्तीचा सन्मान सार्वजनिक नवरात्रोत्सव मध्यवर्ती महामंडळाचा उपक्रम


सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-सालाबादप्रमाणे यंदा रविवार दि १५ ऑक्टोबर ते मंगळवार दि २३ ऑक्टोबर  या काळात शहरात शारदीय   नवरात्रोत्सव आनंदात आणि मोठया प्रमाणात साजरा होत आहे मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने याकाळात विविध समाजउपयोगी उपक्रम राबविण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे. या काळात नऊ दिवस "नारी शक्तीचा सन्मान" करण्याचे आमच्या मध्यवर्ती महामंडळाने ठरविले असून यामध्ये विशेष करून नऊ ते वीस वर्षे वयोगटातील मुलींना डॉ. श्रद्धा जवंजाळ यांच्या माध्यमातून कर्करोग प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे या लसची किंमत साधारण ४००० रुपयांपर्यंत आहे सध्या महिलांनमध्ये वाढत असलेल्या कर्करोगावर मात करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी संपर्क क्रमांक :9011071152,9511717212,7620436567,8329169833 या मोबाइल क्रमांकावर करावे  हि नोंदनी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत करावयाची आहे तसेच घटस्थापनेपासुन विजयादशमीपर्यंत सोलापूर महानगर पालिकेच्या  दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींचा नावावर  1000 रुपयांची ठेव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने ठेवून त्याचे सर्टिफिकेट त्या मुलीच्या मातेला देण्यात येणार आहे तसेच विजयादशमी दिवशी सालाबादप्रमाणे मध्यवर्ती मंडळाच्या वतीने भव्य मिरणवणूक निघत असते ही मिरवणूक  मंगळवार पेठ पोलीस चौकी येथून सुरुवात होऊन मधला मारुती माणिक चौक विजापूर वेस पंचकट्टा पासपोर्ट ऑफिस सिद्धरामेश्वर मंदीर मार्गे पार्क चौक शमी वृक्ष येथे  सीमोल्लंघन खेळून शान्त होतात या मिरवणुकीत ज्या मंडळांनी  श्री शक्तीदेवीच्या मूर्तीस उत्कृष्ट सजावट करणार्‍या मंडळास सोन्याची नथ मध्यवर्ती नवरात्र मंडळाच्या वतीने चार पुतळा चौकात भेट देण्यात येणार आहे सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही २ मंडळांच्या देवीच्या मूर्तीस सोन्याचा नथ अर्पण करण्यात येणार आहे व तसेच मिरवणुकीत सहभागी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा  सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे अशारीतीने मध्यवर्ती महामंडळाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती मंडळाचे ट्रस्टी दिलीप भाऊ कोल्हे,सुनील रसाळे, दास शेळके, अमोल बापू शिंदे,दत्तात्रय मेणकूदळे, मल्लिनाथ मसरे, विजय पुकाळे,गणेश चिंचोळी,मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रशांत बाबर कार्याध्यक्ष प्रशांत कांबळे,उपाध्यक्ष शिवानंद अण्णा सावळगी, आशिष उपाध्ये,निलेश शिंदे,सचिन धोत्रे, गिरिश शहाणे,मल्लिनाथ याळगी  हे परिश्रम घेत आहेत आपल्या माध्यमातून सर्व नवरात्रोत्सव मंडळांना आवाहन करत आहोत की या सर्व उपक्रमास आपण सहभाग नोंदवावा व या उपक्रमाचा फायदा घ्यावा.

*सर्व काही अडचणी असल्यास मंडळाचे अध्यक्ष प्रशांत बाबर मोबाईल नंबर :८२७५३०३९३८ व  दत्तात्रय मेनकुदळे मोबाईल नंबर :८९८३५२८०८० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Reactions

Post a Comment

0 Comments