मुलींनी मोबाईलचा विधायक वापर करावा : संजीवनी व्हट्टे
दत्ताअण्णांकडून दसऱ्यासाठी 300 मुलींना नवीन ड्रेस
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आज ऑनलाईन शिक्षण नसले तरीही शिक्षणासाठी मोबाईलचा काही प्रमाणात वापर करावा लागतो. मोबाईल जितका विधायक आहे तितकाच विध्वंसक आहे. सोशल मीडियाद्वारे काही जण मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री करतात. पुढे त्यांचेच शोषण करतात. आपण सायबर क्राईमची प्रकरणे पाहिलं तर ते आपल्या लक्षात येईल. त्यामुळे मुलींनी मोबाईलचा विधायक वापर करावा असे प्रतिपादन जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजीवनी व्हट्टे यांनी केले.
उद्योगपती व दत्ताअण्णा दातृत्वातून समाजसेवक सुरवसे यांच्या आणि वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून 300 गरीब विद्यार्थिनींना ड्रेस वाटपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर हॉटेल सूर्याच्या संचालिका वैशाली सुरवसे, श्री बृहन्मट होटगीचे सचिव शांतय्या स्वामी, प्राचार्य राम ढाले, उपप्राचार्य रामेश्वर झाडे, वीरशैव व्हिजनचे संस्थापक राजशेखर बुरकुले, उत्सव अध्यक्ष चिदानंद मुस्तारे उपस्थित होते.
प्रारंभी एसव्हीसीएस प्रशालेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत गायिले. विजयादशमीनिमित्त यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील 300 विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते ड्रेसचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास पर्यवेक्षक सिद्रामप्पा उपासे, सचिव नागेश बडदाळ, विश्वस्त सोमेश्वर याबाजी, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार आणि सोमनाथ चौधरी उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविकातून राजशेखर बुरकुले यांनी संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता स्वन्ने यांनी केले तर आभार सोमेश्वर याबाजी यांनी मानले.

0 Comments