Hot Posts

6/recent/ticker-posts

कुलगुरू डॉ. महानवर यांच्याकडून प्रभारी अधिष्ठातांच्या नेमणुका जाहीर !

 कुलगुरू डॉ. महानवर यांच्याकडून 

प्रभारी अधिष्ठातांच्या नेमणुका जाहीर !



सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे नूतन कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या प्रभारी अधिष्ठाता व प्रभारी सहयोगी अधिष्ठातांच्या नेमणुका जाहीर करून संबंधितांना नियुक्तीपत्रे दिली. 



यानुसार विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठातापदी दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समधील डॉ. लक्ष्मीकांत दामा यांची तर प्रभारी सहयोगी अधिष्ठाता म्हणून स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पंढरपूर येथील डॉ. प्रशांत पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता म्हणून डी. ए. व्ही. कॉलेज ऑफ कॉमर्स येथील डॉ. शिवाजी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी संगमेश्वर महाविद्यालयातील डॉ. वसंत कोरे यांची तर प्रभारी सहयोगी अधिष्ठाता म्हणून सोलापूर सोशल कॉलेजमधील डॉ. ईजाज तांबोळी यांची नियुक्ती झाली आहे. 



आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठतापदी वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. राजशेखर हिरेमठ यांची तर दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशनमधील डॉ. विठ्ठल किडगावकर यांची प्रभारी सहयोगी अधिष्ठाता म्हणून निवड झाली आहे. कुलगुरू डॉ. महानवर यांनी सर्व प्रभारी अधिष्ठाता व सहयोगी अधिष्ठाता यांना नियुक्ती पत्रे देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी कुलसचिव योगिनी घारे उपस्थित होते.



Reactions

Post a Comment

0 Comments