Hot Posts

6/recent/ticker-posts

भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचे सोलापूरात जल्लोषात स्वागत

 भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचे सोलापूरात

 जल्लोषात स्वागत

सोलापूर शहर जिल्ह्यात युवा मोर्चाच्या माध्यमातून तरुणांची मोठी

 फळी उभा करून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदी विराजमान

 करण्यासाठी युवा मोर्चा सदैव तत्पर राहणार :-भाजपा युवा मोर्चा

 प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर

सोलापूर:(कटूसत्य वृत्त):-भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर कोल्हापूर येथे संघटनात्मक दौऱ्यासाठी जात असताना भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर वतीनं जुना तुळजापूर नाका येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले याप्रसंगी त्यांना सोलापुरी चादर भेट देण्यात आली.याप्रसंगी बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की,येणाऱ्या काळात माझा सोलापूर दौरा होणार असून,सोलापूर शहर व जिल्ह्यात युवा मोर्चाच्या माध्यमातून तरुणांची मोठी फळी उभा करून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री बनविण्यासाठी युवा मोर्चा सदैव तत्पर असून,आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या निर्देशाप्रमाणे युवा मोर्चा चा प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरून काम करणारा असेल व पुढील काळात सोलापूरात संघटनात्मक दौऱ्यासाठी मी येणार असल्याचे त्यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात विकासाची गंगा आणली आहे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या कोट्यावधी लोकांना त्याचा लाभ होत आहे केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य युवा मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या योजनांद्वारे लोकांचे जगणे उंचावले जावे अशी अपेक्षा आहे यातून राज्य व देश सशक्त बनण्याचे कार्य भाजपने हाती घेतला आहे त्यात युवा मोर्चानेही वाटा उचलला असल्याचे यावेळी लोणीकर म्हणाले आगामी निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नव मतदारांची नोंदणी करण्यासाठी ही मार्गदर्शन करण्यात येणार आहे युवा संवाद आयोजित केले जातील असेही यावेळी ते म्हणाले याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे,शहर उपाध्यक्ष सोमनाथ केंगनाळकर,OBC मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य यतीराज होनमाने,राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य संजय साळुंखे,नगरसेवक अमित पाटील,भाजयुमोचे सागर अतनुरे, अंकुश अवताडे,विशाल बनसोडे,ओंकार होमकर,विठ्ठल सरवदे,गुरुराज तगाडे,संदीप काशीद,सिकंदर कतारी,सिद्धांत बिराजदार व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Reactions

Post a Comment

0 Comments