मुंबई उच्च न्यायालयाकडून पिडीतेस वाढीव पोटगीदेण्याचा आदेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 21, 2023

मुंबई उच्च न्यायालयाकडून पिडीतेस वाढीव पोटगीदेण्याचा आदेश

मुंबई उच्च न्यायालयाकडून पिडीतेस वाढीव पोटगीदेण्याचा आदेश


(मुंबई वृत्त):-- पिडीता नामे अफसाना सरफराज अहमद आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेमध्ये रु.10,000/- पोटगीचा आदेश पारित केला. (अफसाना सरफराज अहमद पटेल) m. 9422968869 मा. ना. उच्च न्यायालय मुंबई. पटेल हिने सोलापूर येथील अंतरिम पोटगीच्या मा. ना. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रक्कम यात थोडक्यात हकीकत अशी की, पिडीता अफसाना सरफराज अहमद पटेल हिने सोलापूर येथील मे. न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत अर्ज दाखल केलेला होता. त्या अर्जामध्ये मे. न्यायालयाने रक्कम रु.5000/- अंतरिम आदेश केलेला होता. त्या आदेशा विरुध्द पिडीता अफसाना सरफराज अहमद पटेल हिचा पती सरफराज अहमद मैनोदीन पटेल यांनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे न्यायालयात अंतरिम पोटगी विरुध्द अपिल दाखल केले त्यामध्ये मे. न्यायालयाने पिडीताची अंतरिम पोटगी रक्कम रु.5000/- वरुन रक्कम रु.3000/- देण्याचा आदेश केला. त्यानंतर यातील पिडीता अफसाना हिस आर्थिक अडचणी तसेच आजारी असल्यामुळे पिडीता हिस सन 2017 पासून सोलापूर येथील मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशाविरुद्ध मा. ना. उच्च न्यायालय, मुंबई येथे अपिल दाखल करता आली
नाही परंतू त्यानंतर यातील पिडीता अफसाना सरफराज अहमद पटेल हिने मा. उच्च न्यायालय मुंबई येथे क्रिमिनल याचिका क्र. WP/3590/2022 अफसाना सरफराज अहमद पटेल विरुध्दसरफराज अहमद मैनोद्दीन पटेल ही याचिका दाखल केली. सदर याचिकाची सुनावणीदि. 10/09/2023 रोजी ठेवण्यात आली. सदर याचिकेमध्ये मा. ना. उच्च न्यायालय, मुंबई येथील न्यायमुर्ती माधव जे. जामदार यांच्यासमोर युक्तीवाद करण्यात आला. सदर युक्तीवादामध्ये पिडीताचे पती सरफराज अहमद मैनोद्दीन पटेल हे कोकणा मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलमठ, गांव- कणकवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे उपशिक्षक या पदावर कार्यरत असून त्यांना वेतन असल्याचे पिडीताचे अॅड. महंमद एस. मुल्ला यांनी युक्तीवाद करुन निदर्शनास आणून दिले. त्यानंतर यातील पिडीताचे अॅड. महंमदएस. मुल्ला यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायालयाने पिडीताची याचिका मंजूर करून पिडीताचे पती सरफराज अहमद मैनोद्दीन पटेल याना पोटगीपोटी रक्कम रु.10,000/- दरमहा वेतनातून कपात करण्याचा आदेश पारित केला. यामध्ये पिडीता अफसाना सरफराज अहमद पटेल तर्फे मा. उच्च न्यायालय मुंबई येथील अॅड. महंमद एस. मुल्ला यांनी काम पाहिले. तसेच अॅड. दिपक किसन भोसले यांनी सहकार्य केले. तसेच पिडीता अफसाना सरफराज अहमद पटेल यांनी संपूर्ण कागदपत्राची पुर्तता केली. पिडीताचे पती सरफराज अहमद मैनोदीन पटेल यांच्यातर्फे अॅड. खतीब वकिल, अॅड. अब्दुला सलीम खलीब यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages