मोहोळ नागरी सहकारी पतसंस्थेस कृषी सहकार क्षेत्रातील आदर्श
पतसंस्था पुरस्कार
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- राज्यातील दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या शेतकऱ्याला सलाम करण्यासाठी तसेच सहकाराच्या माध्यमातून देशाच्या विकासाला चालना मिळावी या विचारधारेतून दैनिक नवराष्ट्र च्या वतीने कृषी सहकार हा पुरस्कार उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी आणि सहकारी संस्थांना दिला जातो. यंदाचा दैनिक नवराष्ट्र ने दिलेला कृषी सहकार आदर्श पतसंस्था पुरस्कार मोहोळ येथील मोहोळ नागरी सहकारी पतसंस्थेस मिळाल्यामुळे या पतसंस्थेची उंची वाढली असून या पतसंस्थेच्या कारभाराचे आणि मिळालेल्या पुरस्कारामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. भारत हा शेतीप्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचे काम शेतकरी राजा कष्ट करून करतोय. म्हणूनच शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असे म्हणतात. शेतीचा शोध सिंध संस्कृतीमध्ये एक स्त्रीने लावला असं मानलं जातं. कृषी क्षेत्रातील विकासाला शेतकरी वर्गाचे मोठे योगदान आहे. कारण शेतीमुळेच उत्क्रांती झाली आहे. कृषी व सहकार क्षेत्राचा चेहरा मोरा बदलणाऱ्या कर्तृत्ववान प्रयोगशील व्यक्ती, कर्तृत्ववान संस्था या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते यंदा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दैनिक नवराष्ट्र कृषी सहकार पुरस्कार मोहोळ नागरी सहकारी पतसंस्थेस मुंबई येथील हॉटेल ताज या ठिकाणी देशाचे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री धनंजय मुंडे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. हा गौरव सोहळा शेतकरी वर्ग ,सहकारी क्षेत्र आणि संस्थेस निश्चितच प्रेरणादायी ठरला. मोहोळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या या यशामध्ये कौशिक गायकवाड सिंहाचा वाटा आहे.

No comments:
Post a Comment