क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय वैद्यक सेवेचा जगभर प्रसार - डॉ .नारायण जाधव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 14, 2023

क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय वैद्यक सेवेचा जगभर प्रसार - डॉ .नारायण जाधव

 क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय वैद्यक सेवेचा जगभर प्रसार 

- डॉ .नारायण जाधव


 वैराग (कटूसत्य वृत्त):- सर्व वैद्यक शास्त्राची जननी आयुर्वेद असून सर्व शाखांच्या समन्वयातून भारतीय वैद्यक सेवा जगभर प्रसारित करण्याच्या योजनेत विद्यार्थ्यांचाही मोलाचा सहभाग आहे .या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे कार्य विद्यापीठ व संस्था करीत आहे . असे मत डॉ .नारायण जाधव यांनी व्यक्त केले. वैराग (ता .बार्शी ) येथे साई आयुर्वेदिक महाविद्यालयात पुणे विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशीक  अंतर्गत  पुणे विभागीय  क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन 9 ऑक्टोबर रोजी स्मार्ट सिटी सोलापूरचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे -पाटील व नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन ,दिल्ली चे सदस्य डॉ .नारायण जाधव यांच्या हस्ते  करण्यात आले

पुणे विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी सोलापूर ,कोल्हापूर, सातारा, सांगली पुणे येथील वैद्यकीय , डेंटल , होमिओपॅथी ,आयुर्वेद ,नर्सिंग अशा विविध  37 वैद्यकीय महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता . 410 विद्यार्थ्यांपैकी 120 विद्यार्थ्यांची जळगाव येथे होणाऱ्या अंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली .

 यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. रवींद्र धिमधिमे, डॉ.रावसाहेब पाटील, साई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ .मीरा सूर्यवंशी, साई आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सायबू गायकवाड, हिंमत ढेंगळे, धिमधिमे, सर्व प्राध्यापक डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते

  राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यासाठी पंच म्हणून बालाजी दळवी , प्रा डॉ .प्रीतम इंगळे , डॉ .सचिन चव्हाण तर व्यवस्थापक म्हणून डॉ . अमीर कोटनाळ ,पार्थ ननावरे , अक्षय मुलगीर यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages