काशी जगद्गुरुंचे नवरात्र तपोनुष्ठान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- काशी पिठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार महास्वामीजी यांचे द्वितीय शारदीय नवरात्र तपोनुष्ठान रविवार दिनांक 15 नोव्हेंबर ते मंगळवार दि. 24 नोव्हेंबर पर्यंत श्री वीरतपस्वी मंदिर चेन्नवीर नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड येथे संपन्न होणार आहे
त्याचप्रमाणे बृहन्मठाध्यक्ष चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली दररोज सायंकाळी ठीक पाच वाजता महाभिषेक व अलंकार महापूजा, कुंकुमार्चन, नवचंडी याग व आशिर्वचन संपन्न होणार आहे त्यानंतर महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे. ज्या सदभक्तांना या पूजेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपली नावे संस्थेच्या कार्यालयात द्यावेत असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment