निवडून आल्यानंतर पक्षभेद न करता प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांची कामे व समस्याचे प्रामाणिकपणे निरसन केलं :-किसन जाधव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 14, 2023

निवडून आल्यानंतर पक्षभेद न करता प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांची कामे व समस्याचे प्रामाणिकपणे निरसन केलं :-किसन जाधव

 निवडून आल्यानंतर पक्षभेद न करता प्रभागातील सर्वसामान्य

 नागरिकांची कामे व समस्याचे प्रामाणिकपणे निरसन केलं :

-किसन जाधव


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 22  रामवाडी जगदंबा देवी ते रामवाडी रिक्षा स्टॉप ते रामवाडी बुद्ध विहार येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सोलापूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी गटनेते किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून सन 2022-23 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 35 लाख 95 हजार रुपये खर्चित डांबरीकरण रस्ता कामाचं शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, रेशन दुकानदार पांडुरंग जाधव, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर उर्फ माऊली जाधव, अब्दुल शेख, रमेश गायकवाड, शंकर गायकवाड, प्रदीप गायकवाड, अब्दुल हसंगी, श्रीशैल तोडकर, जाकीर मुल्ला, तनेश कळणुरकर, दयानंद जाधव, शुभम गायकवाड, सागर कांबळे, वसंत कांबळे, बेनहुर टेलर,जैतून आप्पा शेख,शोभाताई गायकवाड, सुमनताई कांबळे, शकुंतला कांबळे, सुंनदाताई माळगे, सुवर्णाताई गायकवाड, सुवर्णाताई जाधव, सुवर्णाताई शितोळे, रेखाताई रेखाताई गायकवाड, रहमतबी शेख, रत्‍नाबाई जाधव, माऊली जरग, ऋषी येवले, माणिक कांबळे, महादेव राठोड आदींच्या प्रमुख उपस्थितीत या डांबरीकरण रस्त्याच्या कामाचे शुभारंभ विधिवत पूजन करून करण्यात आले. आपल्या प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी झटणारा आणि निवडून आल्यानंतर पक्षभेद न करता सर्वांची कामे करणारा व नागरिकांच्या समस्याचे निरसन करणारा व त्यांचे प्रश्न सोडवणारे नेहमी दूरदृष्टी डोळ्यासमोर प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणारे नेतृत्व म्हणून किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे असे मनोगत यावेळी या शुभारंभ प्रसंगी येथील स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले. प्रभाग क्रमांक 22 येथील स्थानिक रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी आपण पक्ष भेद न करता प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला, निवडणुकीदरम्यान जी आश्वासन नागरिकांना विकास कामानबाबत दिले ती पूर्तता करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो असल्याचे मनोगत याप्रसंगी माजी गटनेते किसन जाधव यांनी व्यक्त केला या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages