आ. गोपीचंद पडळकर यांची मंद्रूप येथे 16 ऑक्टोबरला होणार विराट जाहीर सभा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 14, 2023

आ. गोपीचंद पडळकर यांची मंद्रूप येथे 16 ऑक्टोबरला होणार विराट जाहीर सभा

 आ. गोपीचंद पडळकर यांची मंद्रूप येथे 16 ऑक्टोबरला होणार विराट जाहीर

 सभा अध्यक्ष अमोल बापू कारंडे यांची पत्रकार परिषदेत माहिती



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- धनगर आणि धनगड या शब्दातील दुरुस्तीला आजवर मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. म्हणूनच गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील धनगर समाज बांधव एसटी आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळेच संपूर्ण राज्यामध्ये धनगर समाजाला प्रेरणा देण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये धनगर आरक्षण जागर यात्रेचं आयोजन करण्यात आला असून धनगर समाजाला एसटीचे आरक्षण ताबडतोब मिळालेच पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी बहुजन नायक गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ही धनगर आरक्षण यात्रा संपूर्ण राज्यात पोहोचणार असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये चार ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जाहीर सभा या निमित्ताने होणार असून दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी एक वाजता मंद्रूप येथे आ.गोपीचंद पडळकर यांची भव्य जाहीर सभा होणार  असल्याची माहिती धनगर कृती संघर्ष समितीचे समन्वयक तथा हिंदू धनगर सेनेचे अध्यक्ष अमोल बापू कारंडे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना कारंडे म्हणाले की, " धनगर समाजाला कर्नाटक राज्यातील एसटी आरक्षणाप्रमाणे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून धनगर बांधवांचा क्रांतिकारक लढा महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे. परंतु दुर्दैवाने सत्ताधाऱ्यांच्या आणि सर्वच राजकीय पक्षांच्या उदासीन भूमिकेमुळे अद्याप पर्यंत या लढ्याला यश आलेले नाही. आता मात्र हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्हाला न्याय मिळण्याची शक्यता आहे. परंतु त्यानंतर पुन्हा काही अडचणी आल्यास तमाम धनगर बांधव पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती यावेळी कारंडे यांनी दिली. मराठ्यांना ही आरक्षण मिळाले पाहिजे असे आमची ठाम भूमिका आहे. परंतु गेल्या अनेक वर्षात अनेक मोर्चा आंदोलने रस्ता रोको करून ही राज्य शासन आणि केंद्रशासनाच लक्ष वेधण्याचा प्रयत्न धनगर समाजाच्या वतीने अनेक वेळा करण्यात आला.  तरी शासनाने याचा गांभीर्याने विचार केलेला नाही.  हीच फार मोठी खेदजनक बाब आहे. त्यामुळे आता नाही तर कधीच नाही हा विचार घेऊन आरपारची लढाई म्हणून बहुजन नायक आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जोपर्यंत धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीचा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभर आमदार पडळकर जाहीर सभांच्या माध्यमातून धनगर समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर जागे करण्याचा प्रयत्न  करत आहेत. त्याच उद्देशाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये चार सभा आयोजित करण्यात आल्या असून दिनांक 16 ऑक्टोबर रोजी मंद्रूप येथील लोकसेवा हायस्कूलच्या समोरील मैदानावर विराट जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून  धनगर समाजातील मेंढपाळा वर होणारे  अत्याचार समाजाचे शैक्षणिक आर्थिक मागासले पण मूळ आदिवासी जमात असलेल्या धनगरांना अनुसूचित जाती जमातीच्या अनेक योजना पासून आज पर्यंत वंचित राहवे लागलं आहे. आणि म्हणून त्यामुळेच समाजाच्या आर्थिक प्रगती आणि आर्थिक उन्नती घटली आहे धनगर समाजाला कोणत्याही परिस्थितीत एसटीच्या आरक्षण मिळालीच पाहिजे यासाठी आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आता आरपारची लढाई सुरू झाली असून या सभेला जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील लाखो धनगर समाज बांधव उपस्थित राहणार असून या लढ्याला ताकद देण्यासाठी इतर समाजातील समविचारील नागरिकांनी बांधवांनी तसेच इतर राजकीय पक्ष संघटना यांनी मोठ्या संख्येने या सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन धनगर कृती संघर्ष समितीचे समन्वयक तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य अमोल बापू कारंडे यांनी केले आहे. लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या धनगर आरक्षण जागर यात्रेस श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्रीशैल मामा हत्तुरे यांनी यावेळी जाहीर पाठिंबा दिला

या पत्रकार परिषदेला माझी नगरसेवक सुनील बापू खटके, होटगी स्टेशनचे सरपंच सुहास पाटोळे, धनराज जानकर, सचिन पडवळकर आणि भिषेक भाई कट्टी आदी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages