बाळीवेस शक्ती पूजा व समाजसेवा मंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सवा निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि विधायक कार्यक्रमाचे आयोजन....! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 14, 2023

बाळीवेस शक्ती पूजा व समाजसेवा मंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सवा निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि विधायक कार्यक्रमाचे आयोजन....!

 बाळीवेस शक्ती पूजा व समाजसेवा मंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सवा

 निमित्त विविध धार्मिक,  सांस्कृतिक आणि विधायक कार्यक्रमाचे

 आयोजन....! उत्सवा अध्यक्ष सागर हिरेहब्बू यांची माहिती....!!



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या 32 वर्षापासून सोलापुरातील बाळीवेस शक्ति पूजा  समाजसेवा मंडळ नवरात्र महोत्सव निमित्त विविध विधायक आणि आकर्षक देखावे सादर करून सातत्याने पुरस्कार घेणारे मंडळ असून यंदाही मंडळाच्या वतीने दिनांक 15 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2023 पर्यंत विविध प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक आणि विधायक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे माहिती  नूतन उत्सव अध्यक्ष सागर हिरेहब्बू यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली . पत्रकार परिषदेत पुढे बोलताना हिरेहब्बू म्हणाले की, " जवळपास 60 वर्षांपूर्वी म्हणजे सन 1959 रोजी बाळीवेस चौकातील व्यापारी आणि मान्यवर मंडळींनी एकत्र येऊन बाळीवेस शक्ती पूजा व तरुण मंडळ या नावाने शक्ती देवीची स्थापना केली. त्यानंतर सन 1993 साली मंडळाचे आधारस्तंभ  महेश थोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळाची बाळीवेस शक्ति पूजा व समाजसेवा मंडळ  या नावाने संस्था स्थापन करण्यात आली. यामध्ये राजशेखर हिरेहब्बू, नागनाथ वाले ,महेश भीमाशंकर थोबडे, रेवणसिद्ध अवजे, धपाधुळे, तंबाके बंधू, गुंगे बंधू ,धुम्मा बंधू, बिराजदार,  माशाळे बंधू ,उंबरजे बंधू  या मान्यवर मंडळींचा ट्रस्ट संघ निर्माण करून गेल्या अनेक वर्षापासून नवरात्र उत्सव धुमधडाक्यात आणि अतिशय बहारदारपणे साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. प्रतिवर्षी पोलीस आयुक्तालयाचा प्रथम क्रमांक शक्ती देवी पुरस्कार सलग प्राप्त करणारे मंडळ आहे. आतापर्यंत आमच्या मंडळांनी पाव पुरी जैन मंदिर,  केशव मंदिर,  विद्युत कारंजे,  नरसिंह अवतार,  सीताहरण,  शंकराचे तांडव नृत्य,  श्री राम दर्शन  अशा प्रकारचे भेदक आणि सरस देखावे सादर केले आहेत. यंदाच्या वर्षी मंडळाने ही परंपरा कायम राखली असून " वामन अवतार" हा देखावा सादर करण्याचे मंडळांनी यंदा ठरवले आहे. याबरोबरच मंडळाचा पूर्वीपासून सामाजिक कार्य करण्याचा हातखंडा असून या मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर ,मधुमेह शिबिर,  बाल आरोग्य तपासणी शिबिर,  महिला आरोग्य तपासणी शिबीर ,नवीन शिकाऊ वाहन परवाना शिबिर,  पूरग्रस्तांना मदत ,भूकंपग्रस्तांना मदत,  2021 मध्ये आलेल्या कोरोना महामारी मध्ये वॅक्सिंनसाठी  मंडळातर्फे मदतीचा हा देण्यात आला. यंदाच्या वर्षी आधारस्तंभ महेश थोबडे,  ट्रस्टी अध्यक्ष सुनील गुंगे , आणि उत्सव अध्यक्ष सागर हिरे अब्बू यांच्या संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येत आहेत. कार्यक्रमाचे स्वरूप : - दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी सकाळी साडेनऊ वाजता घटस्थापना आणि दुपारी तीन वाजता मल्लिकार्जुन मंदिर या ठिकाणी मूर्ती पूजा आणि लेझीम मिरवणूक, दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी देखावा उद्घाटन आणि विश्वविनायक ढोल पथकाचा  सादरीकरणाचा कार्यक्रम.., दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 7 ते 9 यादरम्यान मंडपामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्ते देवीची होणार पूजा..., दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान व रक्त तपासणी शिबिर, दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी सात ते नऊ मंडपामध्ये मान्यवरांच्या हस्ते देवीची होणार पूजा.. दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आणि 18 ऑक्टोबर 2023 दोन दिवस बुद्धिबळ स्पर्धेचा आयोजन करण्यात आलेलं आहे. दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी महिलांच्या अतिशय आवडीचा कार्यक्रम महिलांसाठी खास आकर्षण ठरलेला होम मिनिस्टर स्पर्धा दुपारी तीन ते सात वाजेपर्यंत मल्लिकार्जुन मंदिर या ठिकाणी पार पडतील. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पटकाविणाऱ्या विजेत्यास पैठणी साडी आणि द्वितीय पारितोषिक पटकवणाऱ्यास  चांदीची भेटवस्तू दिली जाणार आहे. दिनांक 19ऑक्टोबर रोजी हळदी कुंकुम व महाआरतीचे आयोजन केलेले आहे . या कार्यक्रमासाठी वेळ सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत असून या कार्यक्रमासाठी आवश्यक कर भरलेला नसून  या स्पर्धेचे उद्घाटन जलतरण वर्ल्ड चॅम्पियन रेकॉर्ड..  किती भराडीया (दीदी) यांच्या शुभहस्ते मल्लिकार्जुन मंदिरामध्ये होणार आहे. या मंडळाचे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे नूतन अध्यक्ष सागर हिरेहब्बू, उपाध्यक्ष प्रथमेश तुळजापूरकर ,आकाश कुंभार,  खजिनदार गंगाधर कुडल, महादेव पटणे, राजशेखर मैत्री सचिव ओम रामपुरे ,शैलेश लिंबितोटे कार्याध्यक्ष जगदीश वळसंगे मिरवणूक प्रमुख यश हिरे हब्बू मल्लिनाथ बागदुरे, लेझीम प्रमुख रोहित अवजे, सचिन तुकमाळी, किरण पांढरे, डेकोरेशन प्रमुख श्रेयश पाटील, सचिन मठपती, पूजा प्रमुख नागनाथ वाले, मल्लिनाथ साबने,संजय साबने निखिल थोबडे, योगेश कल्लूरकर, आणि संकेत थोबडे आधी पदाधिकारी नवरात्र उत्सव उत्साहात करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. तरी  हा नयनरम्य आणि सुंदर देखावा पाहण्यासाठी सोलापूरकरांनी अवश्य सहभाग व्हावे आणि सहकार्य करावे. मंडळाचे आधारस्तंभ महेश  थोबडे, आणि ट्रस्ट अध्यक्ष सुनील गुंगे, तसेच उत्सव अध्यक्ष सागर हिरेहब्बू यांनी मंडळाच्या वतीने उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages