Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा मतदारसंघातील 26 गावात पाणंद रस्ते मंजुर करण्याची आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मागणी

 माढा मतदारसंघातील 26 गावात पाणंद रस्ते मंजुर करण्याची

 आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मागणी



अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा विधानसभा मतदारसंघातील 26 गावातील सुमारे 50 कि.मी च्या पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळून निधी उपलब्ध करण्याची मागणी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  केली आहे. 

 माढा विधानसभा मतदार संघातील पंढरपूर, माढा व माळशिरस या तालुक्यातील गावांमध्ये पाणंद रस्त्यांची कामे होणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माढा मतदार संघातील सुमारे 26 गावातील सुमारे 50 किलो मिटरच्या  रस्त्यांसाठी  निधीची मागणी केली आहे. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ कार्यवाही करून प्रस्तावित कामे मार्गी लावण्याचे सुचना दिल्या आहेत.

मागणी करण्यात आलेल्या पाणंद रस्त्यांमध्ये माळशिरस तालुक्यातील वाघोली, पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी, करकंब (2), पट.कुरोली (2), तुंगत, व्होळे, माढा तालुक्यातील उपळाई बु., चांदज (2), उपळाई खुर्द, मानेगांव, मोडनिंब (2), आलेगांव बु., फुटजवळगांव, मोडनिंब, वडशिंगे, नगोर्ली, पिंपळनेर, टेंभुर्णी, तांबवे (टें.), लोंढेवाडी, कापसेवाडी, राहुलनगर (सुल्तानपूर) या गावांचा समावेश आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments