इयत्ता 8 वीची एनएमएमएस परीक्षा 10 ऐवजी 17 डिसेंबर रोजी होणार
माढा (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सन 2023-24 करिता घेण्यात येणारी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा अर्थात एनएमएमएस (NMMS) परीक्षा 10 डिसेंबर ऐवजी रविवारी 17 डिसेंबर 2023 रोजी होणार असल्याचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी काढले आहे.
ग्रामीण व शहरी भागातील माध्यमिक शाळेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतली जाते.ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख 50 हजार रुपये पेक्षा कमी आहे ते विद्यार्थ्यी या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात.ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज दाखल केला आहे त्यांनी याची नोंद घ्यावी.या परीक्षेतून जे विद्यार्थी गुणवत्ता यादीत निवडले जातात त्यांना पुढील चार वर्षे म्हणजेच इयत्ता 9 वी ते 12 पर्यंत प्रत्येकी 12 हजार रुपये अशी 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते.तसेच जे मराठा समाजातील विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होतात त्यांना शासनाच्या सारथी संस्थेकडे विहित नमुन्यातील रितसर अर्ज सादर केला की दर महिन्याला 800 रूपये मिळतात.दरवर्षी सारथी संस्थेकडे नव्याने विहित नमुन्यातील अर्ज सादर केल्यास 9 वी ते 12 पर्यंत सलग चार वर्षे याप्रमाणे 38 हजार 400 रूपये शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो.ही शिष्यवृत्ती योजना होतकर,अभ्यासू व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी खूपच उपयुक्त आहे.
.jpg)
0 Comments