Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांची सोलापुरात होणार जाहीर सभा...!

  मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांची सोलापुरात होणार जाहीर सभा...! 



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा विडा उचलणारे, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे. आणि सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले मिळावेत म्हणून 17 दिवस अन्न आणि पाण्याचा त्याग करून सरकारला घाम फोडणारे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा दिनांक पाच ऑक्टोबर 2023 रोजी सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक माऊली पवार  यांनी श्रमिक पत्रकार परिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेत  दिली.
सोलापूर येथील सभा संपल्यानंतर मंगळवेढा,  पंढरपूर ,कुर्डूवाडी, आणि बार्शी या तालुक्याच्या ठिकाणीही जाहीर सभा 5 आणि 6 तारखेला होणार असून या सभेला येताना मराठा बांधवांनी आपल्याकडे असणारे कुणबी दाखले जुने पुरावे घेऊन सभेला उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी माऊली पवार यांनी केले.
या पत्रकार परिषदेला संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, माजी परिवहन सभापती राजन जाधव, संभाजी आरमार चे संस्थापक श्रीकांत डांगे, प्रा.  गणेश देशमुख, सचिन तिकटे, सूर्यकांत पाटील, आणि दिनकर देशमुख आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments