बनावट सह्या , शिक्के, लेटर पॅड प्रकरणात श्यामसुंदर भिसे सह 13
जणांवर गुन्हा दाखल....!
कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष माजी आमदार विनायकराव उर्फ पांडुरंग पाटील यांच्या बनावट सह्या तसेच संस्थेचे बनावट शिक्के , बनावट लेटर पॅड वापरून संस्थेची फसवणूक केल्याच्या आरोपात कुर्डूवाडी येथील शामसुंदर भिसे यांच्यासह भिसे परिवारातील एकूण 14 जणांवर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 व्यक्तींना माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या कार्यात कायमस्वरूपी हस्तक्षेप करता येणार नाही असाही न्यायालयाने आदेश दिला आहे.
2019 ला माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची नवीन कार्यकारणी जाहीर झाली होती . यामध्ये तालुक्याचे माजी आमदार विनायकराव ऊर्फ पांडुरंग पाटील यांची अध्यक्ष म्हणून सर्व संचालक कार्यकारणीच्या वतीने एकमताने निवड करण्यात आली होती . तर उपाध्यक्ष म्हणून सुनिल पाटील, सचिव म्हणून औदुंबर पाटील , सहसचिव लक्ष्मण जाधव , खजिनदार रावसाहेब पाटील , संचालक सदस्य म्हणून बाळासाहेब पाटील, मोहिनी पाटील, उज्वला पाटील, संभाजी पाटील यांची निवड करण्यात आली.
तर संस्था आम्हाला कशामध्येही बोलवत नाही आम्ही सभासद असताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही . असा आरोप श्यामसुंदर भिसे गटाच्या वतीने करण्यात आला होता. त्याचबरोबर 2015 सालातील बनावट खोटे पावती पुस्तक दाखवून , बनावट कार्यकारणी धर्मादाय आयुक्त सोलापूर येथे मंजूर करून घेतली. त्याविरुद्ध विनायकराव पाटील गटाने पुणे धर्मादाय आयुक्तकडे धाव घेत भिसे गटाच्या कार्यकारणीला कायमस्वरूपी स्टे घेतला. आणि सभासद हे घटनाबाह्य असून यांनी संस्थेमध्ये हस्तक्षेप व अडथळा करू नये असा मनाई आदेश 2023 फेब्रुवारी मध्ये माढा न्यायालयाने दिला. तसेच मा. आ. विनायकराव पाटील यांच्या बनावट सही शिक्के व लेटर पॅड प्रकरणात फाॅरेन्सिक लॅब च्या दाखल्याच्या आधाराने न्यायालयाने आरोपी श्यामसुंदर भिसे, संतोष भिसे ,सुदेश भिसे, राजा सुसलादे , जयश्री भिसे , विवेक काळे ,अमृत मोरे ,भारत काळे, मीना पाटील, तुकाराम पाटील ,कैलास मदने ,दिपाली मदने , राज्यश्री भिसे ,तृप्ती भिसे या चौदा व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कामकाजात व हद्दीत ढवळाढवळ , अडथळा करता येणार नाही असा माढा न्यायालयाने मनाई आदेश काढला.
चेंज रिपोर्ट दाखल करताना संस्थेचे कार्यकारणी मंडळाच्या बैठकीचे सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग बुक तसेच ना हरकत प्रमाणपत्र तसेच संस्थेची बोगस सभासद यादी यावर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या बनावट बोगस सह्या भिसे यांनी संस्थेच्या घटना विरोधी कृती केल्याचे निष्पन्न न्यायालयीन तपासणीमध्ये पाटील गटाच्या वतीने करण्यात आले. फॉरेन्सिक लॅबच्या आधारावर लेटर , सह्या शिक्के सर्व बनावट बोगस असल्याचे न्यायालयाला दाखला देण्यात आला. याचा आधार घेत सदर प्रकरणांमध्ये भिसे गटाच्या चौदा व्यक्तीवर भारतीय दंड संहिता विधान नुसार 49 420 427 466 467 468 471 120 बी 34 593 199 21 अशा गंभीर कलमांच्या द्वारे गुन्हा दाखल करण्याचे आदेश कुर्डूवाडी पोलिसांना 25 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने दिले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निळे करत आहेत .

0 Comments