Hot Posts

6/recent/ticker-posts

पुण्यातील पावसाचा सोलापूरला फायदा; उजनी धरणाची टक्केवारी पोहोचली ४० वर

पुण्यातील पावसाचा सोलापूरला फायदा; उजनी धरणाची टक्केवारी पोहोचली ४० वर


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मागील दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट माथ्यावर पडत असलेल्या पावसामुळे बंडगार्डन व दौंड येथून येणाऱ्या निसर्गामध्ये वाढ झाल्याने उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.

रविवारी दुपारी मिळालेल्या माहितीनुसार सध्या उजनी धरणाची पातळी ४० टक्के एवढी झाली आहे. दरम्यान, दौंड येथून २६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग उजनी धरणात सुरू आहे.

उजनी धरणाच्या वरील बाजूसस असलेल्या १९ पैकी ११ धरणे शंभर टक्के भरले आहेत तर ४ धरणे ९०% च्या पुढे गेली आहेत. खडकवासला धरणही ८५ टक्के भरले आहे. त्यामुळे वरील पिंपळजोगे, वडज, डिंभे, कळमोडी, चासकमान, भामाआसखेड, वडिवळे, आंध्रा व कासारसाई या १० धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बंडगार्डन येथून येणाऱ्या विसर्गात वाढ झाली असून दौंड येथून येणारा विसर्ग २६००० एवढा झाला आहे. तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जवळपास दोन महिने पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. आता रब्बीचा हंगाम तरी हाती लागणार का? उजनी धरण भरणार का? या चिंतेत शेतकरी असताना मागील चार-पाच दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यातच उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने का होईना वाढत असल्याने उजनी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

 

Reactions

Post a Comment

0 Comments