सोलापूर शहरात चोरांचा सुळसुळाट...! पोलीस प्रशासनाची बघ्घाची भूमिका...!! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 6, 2023

सोलापूर शहरात चोरांचा सुळसुळाट...! पोलीस प्रशासनाची बघ्घाची भूमिका...!!

 सोलापूर शहरात चोरांचा सुळसुळाट...!

पोलीस प्रशासनाची बघ्घाची भूमिका...!!



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित होत असले तरी सोलापूर शहरात मात्र मोठ्या प्रमाणात चोऱ्या आणि पाकीट मारी होत असल्याचे दिसत आहे. सोलापूर एसटी बस स्थानकावर सध्या मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे आणि पोलिसांनी डोळे झाक केल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे बस स्थानकामध्ये भीतीचे वातावरण पसरला असून त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त 24 तास वाढवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. सोलापूर हे कर्नाटक, आंध्र प्रदेश, आणि तेलंगणा या राज्याच्या सीमेवर असून मराठवाडा सुद्धा सोलापूर च्या शेजारी असल्यामुळे सोलापूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र पंढरपूर, आणि शेजारच्या जिल्ह्यातील महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता अर्थात तुळजापूर, स्वामी समर्थ नगरी म्हणून ओळखले जाणारे अक्कलकोट, गाणगापूर,  वडवळ येथील नागनाथ मंदिर, अरण येथील सावता महाराज अशी अनेक धार्मिक तीर्थक्षेत्रे या ठिकाणी असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये दररोज हजारो भाविकांची  रेलचेल असते. त्यात विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या प्रवासा त महिलांना 50% सूट दिल्यामुळे सध्या एसटी बस तुफान गर्दीने भरून वाहत आहेत. महिलांची संख्या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे. परंतु एसटी बस स्थानकामध्ये असुरक्षित वातावरण असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आलेला आहे. सध्याच्या फास्ट फूड आणि धकाधकीच्या युगामध्ये प्रत्येकाला लवकरात लवकर मंदिर आणि त्यानंतर दर्शन आणि शेवटी घरी जाण्याची घाई झालेली असते. आणि त्यामुळेच लवकर जाण्याच्या घाईमुळेच अवैध वाहतूक करणाऱ्या टमटम आणि जीप मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांचाही आधार हे प्रवासी लवकर घरी जाण्यासाठी घेत असल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. परंतु महाराष्ट्राची शान म्हणून ओळखली जाणारी एसटी आणि एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांना  शंभर टक्के सुरक्षा एसटी शिवाय मिळत नसल्याचे महिलातूनच बोलले जात आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये एसटी बस वेळेवर येत नाहीत.  आणि निर्धारित वेळेत पोहोचत नसल्यामुळे  एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागले मुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना 50% सूट दिल्यामुळेच पुन्हा एकदा एसटीकडे प्रवासी आकर्षित होऊ लागलेले आहेत. असे असले तरीसुद्धा एसटी बस स्थानकामध्ये मात्र भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून या चोरांना आजपर्यंत पायबंध न घातल्यामुळेच हे चोरटे राजरोसपणे दागिने किंवा पैसे चोरून कोबारा करत असल्यामुळे एसटी प्रशासन आणि पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी महिला वर्गातून होत आहे. बस मध्ये चढत असताना हे चोरटे बरोबर बॅग मधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लुटून पळून जात असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या चोरीमुळे प्रवासांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरू लागले आहे. बस स्थानकात सातत्याने छोट्या मोठ्या भुरट्या चोऱ्या होत असतात यातील बहुतांश प्रवासी पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी जात नाहीत कारण त्या ठिकाणी तक्रार लिहून घेणे ऐवजी 100 प्रश्न विचारले जातात.  त्यामुळे अनेक  प्रवासी चोरी होऊन सुद्धा शांतपणे आपले घर गाठतात. त्याचबरोबर या चोरांचं आणि पोलिसांसून अर्थपूर्ण संबंध असल्याचे सुद्धा काही नागरिकांमधून सांगितलं जात आहे. पोलिसांनी जर प्रामाणिकपणे काम केले तर पाकिटमारी आणि भुरट्याचोऱ्या तात्काळ बंद होतील आणि बस स्थानक सुरक्षित राहील. त्यासाठी पोलिसांनी प्रामाणिकपणे काम करावे आणि या ठिकाणी बंदोबस्त सुद्धा वाढवावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रवाशांना माईक वरून सातत्याने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातात त्याचबरोबर या ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे तरीसुद्धा हे चोर कला दाखवून बरोबर गंडा घालतात आणि पळून जात असल्याचे दिसत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages