अनगर येथे शिक्षक सन्मान सोहळा संपन्न
अनगर (कटूसत्य वृत्त):- अनगर येथे श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने माध्यमिक,उच्च माध्यमिक, बाबुराव पाटील वरिष्ठ महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय, स्टोन ब्रिज पब्लिक स्कूल व अनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांसाठी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कस्तुरबाई शिक्षण शास्त्र महाविद्यालय सोलापूरचे प्राचार्य ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. अश्विन बोंदार्डे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळराजे पाटील हे होते प्राचार्य चंद्रकांत ढोले यांनी प्रस्ताविक केले
सर्वप्रथम सामुदायिक राष्ट्रगीत व राज्य गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व स्वर्गीय लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी 200 शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. बदलत्या शिक्षण पद्धतीत विविध तंत्राचा वापर करुन परिणामकारक अध्यापन करणे गरजेचचे असून विद्यार्थ्यांना शहाणपणा शिकवण्याचे कार्य शिक्षकांनी करावे. शिक्षकांनी लेखन वाचन करावे असेही मत प्राचार्य अश्विन बोंदार्डे यांनी मांडले
आज विद्यार्थ्यांना माहिती व ज्ञान देण्याची अनेक माध्यमे निर्माण झालेली आहेत. त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती व ज्ञान मिळते आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक भागवण्यासाठी कायम अपडेट असले पाहिजे. त्यांनी नव नवीन बदल स्वीकारले पाहिजेत.
( बाळाराजे पाटील अध्यक्ष श्रीअनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ अनगर)
यावेळी संचालक मधुकर मारडकर, लहू निरगुडे, किरण गुंड, बजीरंग डिकोळे, प्राचार्य चंद्रकांत ढोले, प्राचार्य डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी, मुख्याध्यापक विश्वजीत लटके, मुख्याध्यापक रामचंद्र पाटील, प्राचार्य महेश करंडे, प्राचार्य तुळशीदास ढेरे, उपप्राचार्य सिताराम बोराडे, पर्यवेक्षक चंद्रकांत यावलकर, केंद्रप्रमुख महादेव माने यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले तर सिताराम बोराडे यांनी आभार मानले


No comments:
Post a Comment