महसूल प्रशासन चिरीमिरी काढण्यात व्यस्त...! वाळू माफिया करताहेत अवैध वाळू फस्त..!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या अवैध वाळू उपसा राजरोसपणे सुरू असून तो थांबवण्यासाठी प्रशासन कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करत नाही. कारण महसूल प्रशासनाला वाळू माफिया चिरीमिरी देऊन तोंड दाबत असल्याचं नागरिकांमधून बोलले जात आहे. या चिरीमिरीच्या आणि खाबोगिरीच्या प्रकारामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल पुन्हा एकदा पाण्यात जात आहे. आणि वाळू माफिया मात्र मालामाल होत आहेत. नदी काठावर राहणाऱ्या आणि सध्या वाळूमाफिया म्हणून काम करणाऱ्यांना पूर्वीच्या काळी मोडकी सायकल मिळत नव्हती. याच वाळू माफी यांना आज उंच उंच हवेल्या आणि मोठमोठ्या बीएमडब्ल्यू कार मिळू लागल्यामुळे फार मोठा मलिदा या अवैध वाळू उपसातून मिळत असल्याचे दिसत असल्यामुळे अनेक लोकांनी यामध्ये भरमसाठ पैसा कमावण्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. तुम्ही बी खावा आम्हाला बी खाऊ द्या याच विचारधारेतून सध्या वाळू माफिया आणि पोलीस प्रशासन काम करत असल्यामुळे निश्चित पणे यामध्ये सरकारचा महसूल मात्र बुडत आहे हे मात्र वास्तव आहे. अनेक वाळू माफी यांना राजकीय वरदहस्त मिळत असून राजकीय नेत्यांचे बगलबच्चेच अशा प्रकारच्या धंद्यामध्ये नेत्यांचा वापर करून मालामाल होत असल्याचे दिसत आहे. परंतु याचा परिणाम मात्र घर बांधणाऱ्या गरिबांना वाळू घेताना मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. सरकारने ऑनलाईन वाळू देण्याचं धोरण आखलं असलं तरी हे धोरण मात्र पूर्णपणे फसला असून यामुळे उलट वाळू महागच झाल्याचे दिसत आहे. वाळूच्या किमती भरमसाठ वाढल्यामुळे गरिबांना घर बांधणे सध्या जिकरीचे झालेले आहे. यासंदर्भात महसूल प्रशासन आणि पोलीस अधिकारी यांच्या अभद्र युती झाल्यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसूल उडत असून सर्वसामान्य माणसांना सुद्धा महागड्या दरामध्ये वाळू खरेदी करावी लागत असल्यामुळे यासाठी सरकारने कठोर निर्बंध लावून वाळूमाफ यांना वेसन घातली पाहिजे. अन्यथा वाळूचे भाव सोन्यापेक्षा जास्त होतील अशी भीती व्यक्त होत आहे.
.png)
No comments:
Post a Comment